Maruti omni Electric MPV Render ।। मारुती ओमनी बनली इलेक्ट्रिक एमपीव्ही

Maruti omni Electric MPV Render ।। मारुती ओमनी बनली इलेक्ट्रिक एमपीव्ही 


आत्ताच्या घडीला ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांवर जास्त लक्ष दिले जात आहे. बऱ्याच कंपनी आपले इलेक्ट्रिक वाहन बाजारात घेऊन आले आहेत, बाकी कंपनी आपले वाहन लवकरात लवकर आणण्याची तयारी करत आहेत. काही कंपन्या अशा आहेत ज्या आपल्या जुन्या गाड्या या इलेक्ट्रिक व्हेईकल्स मध्ये बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.


उदाहरणादाखल टाटा मोटर्स ने या वर्षीच्या ऑटो एक्स्पो 2020 मध्ये टाटा सिएरा कन्सेप्ट समोर आणली होती. टाटा सिएरा ही 1990 च्या काळात टाटा कंपनीची एक नावाजलेली एसयूव्ही होती.

याशिवाय काही काळापूर्वी मारुती सुझुकीने त्यांची लोकप्रिय मारुती सुझुकी 800 ला ऑनलाइन रेंडर केले होते. ही देखील एक डिजिटल कार होती. आता पुन्हा मारुतीच्या आणखी एक कारला ऑनलाइन रेंडर केले आहे.


यावेळी एका डिझाइनर ने मारुती सुझुकीची नेक्स्ट जेन मारुती ओमनी ला एक इलेक्ट्रिक कार म्हणून समोर आणले आहे. मारुती ओमनी ची विक्री तर बंद झालेली आहे परंतु तरी देखील ही कार आजच्या जीवनात एक अविभाज्य घटक आहे.


भारतात आजही बरेच लोक म्हणजेच खासकरून छोटे व्यापारी या ओमनी गाडीचा वापर करतात. या इलेक्ट्रिक ओमनी ला ऑटोमोबाईल डिझाईनचा विद्यार्थी शशांक शेखरने समोर आणले आहे.


ही एक नेक्स्ट जेन मारुती ओमनी आहे जी इलेक्ट्रिक पॉवरट्रेनवर आधारित आहेत. आईसी इंजिन चालणाऱ्या मारुती ओमनी प्रमाणेच इलेक्ट्रिक ओमनीला देखील एक बॉक्सि डिझाईन दिले गेले आहे. 


या इलेक्ट्रिक ओमनी मध्ये एक सेमी बोनेट बघायला मिळते. याला देण्याचे कारण म्हणजे आत्ताच्या जीवनात या बोनेटमुळे गाडीला एरोडायनॅमिक डिझाईन मिळाली आहे. ज्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स वाढला जाईल.


हिच्या पुढच्या भागात C आकारात आणि सरळ रेषेत एलईडी इन्सर्ट सोबत आयताकार हेडलॅम्प बसवलेले आहेत. याशिवाय गाडीच्या खालील भागात एलईडी फॉग लॅम्प दिलेले आहेत यामुळे गाडीचा लूक अधिक आकर्षक बनतो.

साईड प्रोफाइल मध्ये चौकोनी व्हील आर्क, चंकी विंग मिरर आणि ऍलोय व्हील आहेत. ओमनी इलेक्ट्रिक मध्ये ब्लॅक अंडरबॉडी क्लेडिंग आणि जास्त ग्राउंड क्लियरन्स दिलेला आहे. मागील बाजूस एलईडी लाईट गाईड सोबत टेलगेट वर पूर्ण रुंदीची एलईडी स्ट्रीप लावलेली आहे.