India's first electric car ।। भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार लवबर्ड का ठरली अपयशी

India's first electric car ।। भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार लवबर्ड का ठरली अपयशी


आज जगभरातील कंपन्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या मागे लागल्या आहेत. देशात टाटा मोटर्स, महिंद्रा, हुंडाई यासारख्या कंपन्या प्रत्येक महिन्यात एक चांगल्या नंबरमध्ये कार विक्री करत आहेत. हे सर्व सगळ्यांना माहीत आहे परंतु भारतात जवळपास 20 वर्षांपूर्वी एक कंपनीने देशात पहिली इलेक्ट्रिक कार आणली होती. 

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात या कार विषयी जास्त चर्चा झाली नाही करण ही कार एक अयशस्वी कार ठरली. या कार कंपनीने देशाला पहिली इलेक्ट्रिक कार देण्याचा पूर्णपणे प्रयत्नन केलेला होता.

जवळपास वीस वर्षांपूर्वी भारतीय कंपनी एड्डी ने लवबर्ड नावाने त्यांच्या इलेक्ट्रिक कारची सिरीज सुरू केली होती. ही कार टाटा नॅनो च्या साईज ची होती आणि यात 2 व्यक्तीबसू शकतील इतकी जागा होती. कंपनीने ही कार जपानच्या यास्कावा इलेक्ट्रिक यांच्या टेक्नॉलॉजि सोबत मिळून बनवली होती. 

सुरुवातीला या कारची निर्मिती केरळच्या चलाकूडी आणि केरळच्या कोयम्बतुर मध्ये केली. या कारमध्ये लीड ऍसिड रिचार्जेबाल बॅटरी वर चालणारी डिसी इलेक्ट्रिक मोटरचा वापर केलेला होता. त्या काळात लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जात नव्हता त्यामुळे ही बॅटरी वापरण्यात आली असावी.

बॅटरी चार्ज करण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून गाडी पोर्टेबल बनवलेली होती, जेणेकरून ती घरात देखील चार्जिंगला लावता येऊ शकेल. लीड ऍसिड बॅटरीचा चार्ज होण्यासाठी 6 तास लागत होते. 6 तासांच्या चार्जिंग मध्ये हइ कार 60किमी रेंज देत होती.

कारची इलेक्ट्रॉनिक सिस्टम ही आशा प्रकारे बनवली गेली होती की ज्यामुळे देखील ड्रायव्हरला गाडी चालवताना स्मूथ एक्सपिरियन्स येऊ शकेल. ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स अधिक उत्कृष्ठ बनवण्यासाठी कार मध्ये त्या काळातील सर्व उत्तम इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवली गेली होती. 


या कार मध्ये ट्रान्समिशन सिस्टम देखील बसवली गेली होती. कार मध्ये 4 गियर दिलेले होते आणि सोबत एक रिव्हर्स गियर देखील होता. ही कार मुख्यतः शहरातील लोकांसाठी बनवली गेली होती. एक छोटीशी इलेक्ट्रिक कार ही होती परंतु यात खूप कमी देखील होती.

या कारची सर्वात मुख्य कमतरता म्हणजे या कार मध्ये कमी पॉवरची इलेक्ट्रिक मोटार वापरलेली होती ज्यामुळे रस्त्यावर ही कार खूप कमी स्पीडणे चालायची. यामूळे ही कार 15 डिग्री पेक्षा जास्त चढाई चढू शकत नव्हती. त्या काळात फ्लाय ओव्हर खूप कमी होते त्यामुळे ही समस्या नवहती पण या कारमध्ये असलेली सर्वात मोठी कमतरता होती.

क्यो फ्लॉप हुई लवबर्ड? / Why India's First Electric Car Flopped?

लवबर्डची विक्री ही कधीच 100 युनिट पेक्षा जास्त होऊ शकली नाही. कारच्या इतक्या कमी विक्रीमुळे विक्रेता कंपनी एड्डीला खूप नुकसान व्हायला लागले. या गोष्टिमुळे कंपनीने या कारचे उत्पादन बंद केले. या कारचे फेल होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही कार भारतात वेळेच्या आधी लाँच झाली.


1990 च्या काळात इलेक्ट्रिक व्हेईकल टेकनिक ही खूप नवीन होती. खुपकमी प्रमाणात भारतीय या इलेक्ट्रिक कार असू शकते याविषयी जाणून होते. इलेक्ट्रिक कारची कमी रेंज आणि चार्जिंग करायला येणारे प्रॉब्लेम यामुळे लोक या कारपासून चार हात लांबच राहत. त्या काळात सरकारने कारवर मिळणारी सबसिडी बंद केली होती ज्यामुळे ही कार खूप महाग झालेली होती.

Why Lovebird Electric Car Flopped? 

याशिवाय त्या काळात मारुती 800 सारख्या भरोष्याच्या आणि फॅमिली फ्रेंडली कार लाँच झाल्याने ग्राहकांनी या कार कडे लक्ष दिले नाही.लवबर्डला 1993 झालेल्या ऑटो एक्स्पो मध्ये देखील कंपनीने सादर केलं होते. 

भारतीय बाजारात रेवा च्या लाँच नंतर इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड पुन्हा सुरू झाला परंतु तो जास्त काळ टिकू शकला नाही. महिंद्राने रेवा विकत घेतल्यानंतर ई2ओ लाँच केली.  सध्याच्या काळात टाटा, एमजी आणि हुंडाई सारख्या कंपन्या बाजारात त्यांच्या इलेक्ट्रिक कार विक्री करत आहेत. यासोबत समोर येणाऱ्या काळात अनेक भारतीय कंपन्या आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार घेऊन येणार आहेत.

Image Courtesy: ElectricVehicles