Nissan Magnite Review : निसान मैगनाईट कशी आहे? बनू शकेल का Compact SUV मध्ये उत्तम?

Nissan Magnite Review : निसान मैगनाईट कशी आहे? बनू शकेल का Compact SUV मध्ये उत्तम?


किंमत- ४.९९ लाख ते ९.९७ लाख 

निसान मैग्नाइटचे मुख्य स्पेसिफिकेशन

निसान मैग्नाइट सोबत 1 पेट्रोल इंजिनचे ऑपशन मिळते. तिचे पेट्रोल इंजिन हे 999 सीसी आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत उपलब्ध आहे. व्हेरियंट आणि फ्युएल टाईपच्या आधाराने गाडीचे मायलेज 17.7 ते 20.0 किमी/ लिटर इतके आहे.  मैग्नाइट SUV आहे आणि तिची लांबी 3994 मिमी, रुंदी 1758 मिमी आणि व्हीलबेस 2500 मिमी इतका आहे.

एआरएआई मायलेज - 17.7 किमी/लिटर
फ्युल टाईप - पेट्रोल
इंजिन डिस्प्लेसमेंट - 999 सीसी
अधिकतम पावर - 98.63 bhp @ 5000 rpm
अधिकतम टॉर्क - 152 nm @ 2200-4400 rpm
ट्रान्समिशन - ऑटोमॅटिक  / मॅन्युअल
बूट स्पेस - 339 लिटर
फ्युल टॅंक क्षमता - 40 लिटर
बॉडी टाईप - SUV

मुख्य फीचर्स

पावर स्टीयरिंग - √
पावर विंडो फ्रंट - √
अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम - √
एयर कंडिशन - √
ड्राइव्हर एयर बॅग - √
पॅसेंजर एयरबॅग - √
ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल - √
फॉग लाईट्स फ्रंट - √
अलॉय व्हील्स - √

निसान ने त्यांची मैगनाईट ही सब-४ मीटर SUV गाडी लौंच केली आहे. हि गाडी दिसायला अतिशय सुंदर तर आहेच परंतु भरपूर चांगल्या फीचर्स सोबत टर्बो पेट्रोल इंजिन आणि automatic गियरबॉक्स देखील आहे. गाडीची एक्स शो-रूम किंमत ४.९९ लाख ते ९.३५ लाखाच्या दरम्यान आहे. किंमतीचा विचार करता अशा प्रकारच्या गाड्यांच्या सोबत तुलना केल्यास सर्वात कमी किंमत याच गाडीची आहे. आता गाडीची किंमत कमी म्हणल्यावर कुठे तरी काही तरी कमी नक्की असणार!

एक्सटीरियर- 


मैगनाईट हि सब-कॉम्पैकट एसयुव्ही असून तिचा आकार आकर्षक आहे. तुम्ही ज्यावेळी मैगनाईट ला बघाल तर हिची तुलना नक्की निसान च्या किक्स सोबत कराल. आपल्या सेगमेंटच्या इतर कारपेक्षा मैगनाईट  हि जास्त मोठी नाहीये परंतु तिच्या डिजाइन आणि स्टान्समुळे ती लांब भासते. 

रेनो ट्रायबर ज्यावर बनवली गेली त्या सीएमएफ-ए+ प्लेटफोर्म च्या सुधारित आवृत्तीवर निसान मैगनाईट बनवलेली आहे. याच प्लेटफोर्म वर रेनो काइगर देखील बनवली जात आहे.

मैगनाईट कार चा ग्राउंड क्लियरन्स हा कुठल्याही लोड व्यतिरिक्त २०५ मिलीमीटर इतका आहे. मैगनाईटच्या XV आणि XV प्रीमियम या संस्करणामध्ये १६ इंच चे व्हील Standard दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त तुम्हाला बेस वेरीयंट पासूनच ५० किलोग्रामची फंक्शन रुफ सेल्स देखील दिलेली आहे.

समोरून बघितल्यावर मैगनाईट आपल्याला निसान किक्स च वाटते. इथे स्वेप्टबैक हेडलैम्प दिले आहेत आणि खाली काळ्या रंगाच्या लोवर लीप मध्ये फॉग लाईटस ची हाउसिंग दिलेली आहे. मैगनाईटची ग्रील ही जवळपास datsun च्या ग्रील सारखी आहे. निसान ने मैगनाईट च्या दिलेल्या कन्सेप्ट मोडेल प्रमाणेच या गाडीची पूर्ण डिजाइन आणि लुक आहे. 

निसान ने इथे एलईडी हेडलाईट सोबत, एलइडी फॉगलेम्पस आणि इंडिकेटर देखील एलईडी दिलेले आहेत. एकसयुव्ही ३०० प्रमाणे मैगनाईटच्या बंपरवर देखील एलईडी डेटाइम रनिंग लैम्प दिलेले आहेत. एलईडी हेडलाईट हे फिचर मैगनाईट च्या Top Varient XV Premium मध्ये आहे. बाकी वेरीयंट मध्ये हेलोजन रिफ्लेकटर हेडलाईट दिलेले आहेत. एलईडी डेटाइम रनिंग लाईट आणि फॉगलाईट फक्त XV आणि XV PREMIUM या वेरीयंट मध्येच बघायला मिळतील.


मैगनाईटचा साइड व्हिव हा स्पोर्टी दिलेला आहे. इथे डायमंड कट अलॉय व्हील दिलेले आहेत आणि मोठा रुफ स्पोयलर दिला आहे. गाडीच्या व्हील आर्क क्लेंडीगवर रिफ्लेकटर साठी इंडेटस दिले आहेत. टू टोन कलर ऑप्शन सोबत या गाडीचा साईड लुक अगदी जबरदस्त आहे.

निसान ची मैगनाईट  हि कार सिल्व्हर, ब्राऊन, ब्लैक आणि व्हाईट या चार कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. ड्युअल टोन मध्ये ब्लैक आणि रेड, ब्लैक आणि ब्राऊन, ब्लैक आणि व्हाईट, व्हाईट सोबत ब्ल्यू असे पर्याय उपलब्ध आहेत. फ्रंट साईडच्या तुलनेत रियर साईडला क्लैडिंग जास्त दिलेले आहेत. याशिवाय रियर वायपर आणि Washer देखील दिलेले आहेत.

इंटीरियर 


जेव्हा आपण गाडीच्या आतमध्ये बघाल तेव्हा कंपनीने किंमत का कमी ठेवली याचे उत्तर मिळते. मैगनाईट च्या केबिनची डिजाईन एक चांगली बनवलेली आहे. कार ला वेगळे दाखवण्यासाठी निसान ने केबिन मध्ये अनावश्यक गोष्टी जोडल्या नाहीयेत. षटकोनी आकारचे AC वेन्ट आणि सिल्व्हर क्रोम रंगात हायलाईट्स मैगनाईटला स्पोर्टी लुक देते.

गाडीच्या आतमध्ये वापरले गेलेले प्लास्टिक हे उत्तम प्रतीचे आहे. डोअर पैडस वर असलेले ग्रे fabric खूप मुलायम आहे. परंतु गाडीच्या फिटमेंटची क्वालिटी ही बजेट फ्रेंडली असल्याची जाणीव करून देते.

फुटवेल भागात जागा कमी आहे आणि त्यामुळेच फ्लोर पैडल खूप जवळ दिलेले आहेत, परंतु यामुळे लांब पाय असणाऱ्यांना थोडासा त्रास सहन करावा लागू शकतो.

निसान ने मैगनाईटच्या केबिन स्पेस ला पुरेपूरपणे वापरले आहे. फ्रंट आणि रियर सीट्स वर आरामदायक प्रवास होऊ शकेल. हेडरूम स्पेस देखील पुरेशी दिलेली आहे. ४ हेडरेस्ट च फिचार्ब या गाडीत दिलेले आहे. Top वेरीयंट मध्ये ड्रायव्हर साठी फिक्स्ड आर्मरेस्ट दिलेले आहे. XL Turbo, XV आणि XV PREMIUM मध्ये रियर पसेंजर सीट ला कप होल्डर सोबत आर्मरेस्ट आणि फोन होल्डर देखील दिलेले आहे.

केबिन मध्ये स्टोरेज स्पेसला देखील कमतरता नाहीये. सर्व डोअर पॉकेटस वर १ लिटरची बाटली नक्की ठेवता येईल इतकी जागा आहे. गाडीमध्ये १० लिटरचा ग्लवबॉक्स आणि सेंटर कन्सोलवर कप आणि मोठी बाटली ठेवली जाऊ शकते. वायरलेस चार्जींज पैड वर तुम्ही wallet किंवा फोन ठेऊ शकता, त्याच्याच खाली USB पोर्ट सोबत १२ volt चे सॉकेट दिलेले आहे.

या नवीन SUV मध्ये ३३६ लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे. मैगनाईटच्या XL Turbo, XV आणि XV PREMIUM या संस्करणामध्ये ६०:४० मध्ये विभागले जाणारे रियर सीट्स आहेत, यांना फोल्ड केल्यावर ६९० लिटर इतकी बूटस्पेस तयार होते.

टेक्नोलॉजि 


निसान मैगनाईट मध्ये सर्वात आवडती गोष्ट म्हणजे त्यांनी दिलेला गेमिंग डिव्हाइस सारखा इंटरफेस असलेला ७ इंचाचा डिजिटल इंस्तृमेंट क्लस्टर ! या डिजिटल क्लस्टर वर टाइम, डोर बूट अजर वार्निंग, आउटसाईड टेंपरेचर दिस्प्ले, ट्रीप मीटर्स, सीविटी वेरीयंट मध्ये ड्राईव्ह मोड सलेकट, फ्युल कंजंप्सन इंफोर्मेषण आणि टायर प्रेशर स्टेटस शो करते. क्लस्टरला स्टीयरिंग वर असलेल्या कंट्रोल्स वरून ऑपरेट करता येते.

इतर फीचर्स

8 इंच टचस्क्रीन इन्फोटेंमेंट सिस्टम : युजर फ्रेंडली इंटरफेज आहे आणि जास्त फिचर दिलेले नसल्याने सोप्पा आहे. परंतु कधी कधी लॅग देखील होतो.

अँड्रॉइड ऑटो ऍंड एपल कारप्ले : ब्ल्यूटूथ ने पेअर करून वायरलेस पध्द्तीने हे फिचर स्मूथली काम करते.

360 डिग्री कॅमेरा : रिसोल्युशन इतकं खास नाहीये आणि अँगल देखील योग्य नाहीयेत. रात्री सर्वसामान्य क्वालिटी हे कॅमेरा देतात.

पुश बटन स्टार्ट आणि स्मार्ट की

रियर एसी व्हेंट सोबत ऑटो AC 

क्रुज कंट्रोल

वायरलेस फोन चार्जर (टेक पॅक सोबत ऑप्शनल एक्स्ट्रा)

एयर प्युरीफायर (टेक पॅक सोबत ऑप्शनल एक्स्ट्रा जे वेन्यू सारख फ्रंट कप होल्डरच्या जागेवर दिलेले आहे)


पडल लॅम्पस (टेक पॅक सोबत ऑप्शनल एक्स्ट्रा)

एलईडी स्कफ प्लेट्स 

जेबीएल प्रीमियम स्पीकर्स (टेक पॅक सोबत ऑप्शनल एक्स्ट्रा) : साऊंड क्वालिटी ठीकठाक आहे. ज्यांना जोरात आवाजात म्युसिक आवडते त्यांच्यासाठी हे बनले आहे परंतु ज्यांना म्युसिक चा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पद्धतीने बाहेरून सिस्टिम बसवून घ्यावी.

निसान कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी : एक्सव्ही प्रीमियम टर्बो सोबत हे फिचर ऑप्शनल दिलेले आहे. यामध्ये व्हेईकल ट्रॅकिंग, स्पीड अलर्ट, जिओफेन्सिंग आणि व्हेईकल हेल्थ डेटा यासारखे फीचर्स उपलबद्ध आहेत.

परफॉर्मन्स

निसान मैग्नाइट मध्ये दोन पेट्रोल इंजिन चा ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये डिझेल आणि सीएनजी दिले जाण्याची संभावना कमीच आहे. 

इंजिन स्पेसिफिकेशन

इंजिन 1.0 लिटर, 3 सिलेंडर नॅचरली इस्पिरिटेड इंजिन 1.0 लिटर, 3 सिलेंडर टर्बोचार्ज

पावर 72 पीएस @ 6250 आरपीएम 100 पीएस @ 5000 आरपीएम

टॉर्क 96 एनएम @ 3500 आरपीएम 160 एनएम @ 2800-3500 आरपीएम(एमटी) 152 एनएम @ 2200-4400 आरपीएम (सीविटी)

ट्रान्समिशन 5-स्पीड मॅन्युअल 5 स्पीड मॅन्युअल/सिविटी

मायलेज 18.75 किमी/लिटर 20 किमी/लिटर (एमटी) 17.7किमी /लिटर(सिविटी)

गाडीचे इंजिन सुरू करताच गाडी न्यूट्रल मध्ये असल्यावर इंजिनचे वायब्रेशन केबिन मध्ये देखील जाणवतात. परंतु गाडी सुरू झाल्यावर म्हणजे चालल्यावर ते नाहीसे होतात. शहरात चालवण्यासाठी मैग्नाइट ही उत्तम कार आहे कारण तिच्यात पावर भरपूर आहे जी ट्राफिक मध्ये खूप गरजेची असते, त्यामुळे मैग्नाइट ट्राफिक मध्ये अगदी स्मूथली जाते.

1800 आरपीएम वर टर्बोचार्जर किक्स येण्याअगोदर एक कमी जाणवते परंतु हळू स्पीड मध्ये गाडीच्या पावरची जाणीव होते. 2000 आरपीएम आणि एक योग्य गियर मध्ये हाय स्पीड ओव्हरटेकिंग मध्ये ही गाडी आपल्याला अतिशय उत्तम भासते.

आता प्रश्न हा उरतो की हिच्या कोणत्या व्हर्जन ला घेतले पाहिजे, तर आम्ही सिविटी ला सजेस्ट करू! निसान ने हिला खूप चांगल्या प्रकारे ट्यून केले आहे आणि थ्रोटल इनपुटस देखील खूप उत्तम आहेत.

निसान ने दावा केलाय की मैग्नाइट टर्बो पेट्रोल मॅन्युअल व्हर्जन मध्ये 0 ते 100 हा स्पीड गाठण्यासाठी 11.7 सेकंद इतका तर टर्बो पेट्रोल सिविटी मध्ये 13.3 सेकंद इतका वेळ लागतो.

एक्सलरेशन देताच रेस चा साऊंड सुरुवातीला जोरात येतो परंतु नंतर तो नॉर्मल होतो. कंपनी ने सिविटी ऑटो मध्ये मॅन्युअल मोड द्यायला पाहिजे होता जेणेकरून गाडी चढावर किंवा उतारावर अगदी सहज चढू अथवा उतरू शकेल. चढाईसाठी या गाडीत एल मोड आणि स्पोर्ट साठी लिव्हर माउंटेड बटन दिलेले आहे. 

मैग्नाइट चा 5-स्पीड गिअर बॉक्स हा वापरण्यासाठी सोप्पा आहे परंतु कधी कधी तो गिअर बदलताना त्रास देतो. गियर बॉक्स वर थोडा जोर दिल्यास तो भारी वाटायला लागतो. बंपर टू बंपर ट्राफिक मध्ये या गाडीचा क्लच थोडासा जड जातो ज्यामुळे याच्या वापराने ड्रायव्हर थकून जातो. 

मैग्नाइटची राईड क्वालिटी ही सर्वात खास गोष्ट आहे. ओबडधोबड आणि खड्डे असलेल्या रस्त्याना ही गाडी सहज पार तर करतेच पण केबिन मधल्या कोणालाही त्याची जाणीव देखील होत नाही. परंतु गाडीच्या सस्पेंशन चा आवाज खोल खड्ड्यांमधून जाताना जाणवतो.

निसान मैग्नाइट दररोजच्या वापरात येणारी गाडी बनू शकेल. याव्यतिरिक्त जास्त अपेक्षा या गाडीविषयी न ठेवलेल्या बऱ्या! कॉर्नर वर ही कार सहजपणे चालवली जाऊ शकते परंतु गाडीत बसलेल्या पॅसेंजरला बॉडी रोल नक्की जाणवतो. मैग्नाईट चा लाईट स्टॅरिंग व्हील जास्त चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देऊ शकत नाही. त्यामुळे स्टेअरिंग वर सतत कंट्रोल ठेवावा लागतो. टर्न वर गाडीचे सस्पेंशन चांगल्या प्रकारे काम करतात परंतु ब्रेक दाबण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 

सारांश मध्ये, निसान मैग्नाइट ही इकोस्पोर्ट अथवा एक्सयूव्ही 300 सारख्या गाड्यांप्रमाणे स्पोर्ट एक्सपेरियन्स नाही देणार आणि इतका खराब अनुभव देखील नाहीये.

सुरक्षा

मैग्नाइट मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, इबीडी सोबत एबीएस आज रियर पार्किंग सेन्सर सारखे स्टॅंडर्ड फीचर्स दिलेले आहेत. आईएसओ फिक्स चाईल्ड सीट अँकर फिचर एक्सएल टर्बो व्हेरियंट मध्ये मिळते. XV व्हेरियंट मध्ये रियर कॅमेरा आणि XV Premium व्हेरीयंट मध्ये टायर प्रेशर मॉनिटर आणि या सेगमेंट मधला पहिला 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. सर्व टर्बो व्हेरियंट मध्ये ट्रेकशन कंट्रोल, स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेक असिस्ट आणि हिल स्टार्ट असिस्ट यासारखे फीचर्स मिळतात. मैग्नाईट च्या कोणत्याच व्हेरीयंट मध्ये साईड आणि Curtan एअरबॅग चा ऑप्शन नाहीये.

भारतात निसान मैग्नाइट ची किंमत जरी कमी ठेवली असली तरी यात खूप साऱ्या कमतरता जाणवतात. गाडीच्या आतल्या केबिनची फिनिशिंग आणि फिटिंग ही एका बजेट कार सारखी आहे. कदाचित बरेचसे ग्राहक यात डिझेल ऑपशन नसल्याने नाराज होऊ शकतात. या कार मध्ये टर्बो पेट्रोल मोड जरी दिलेला असला तरी देखील स्पोर्ट मूड आवडणाऱ्या लोकांना निराशा होतेच. तसेच निसान चा सेल्स आणि सर्विस इतकी स्ट्रॉंग नसल्याने हा फॅक्टर देखील या गाडीच्या सेलला धोक्याचे निशाण आहे.

जर तुम्ही प्रीमियम दर्जाचा अनुभव घेऊ इच्छिता तर निसान मैग्नाइट तुमच्यासाठी बनलेली आहे. परंतु जर स्पेस, प्रॅक्टिकेलिटी, फीचर्स आणि कम्फर्ट ड्रायव्हिंग सारखे फीचर्स तुम्ही शोधत असाल तर मैग्नाइट तुमच्यासाठी योग्य असेल. 


निसान मैग्नाइट व्हेरियंट आणि किंमत

(CVT हे ऑटोमॅटिक व्हर्जन आहेत)

Magnite XE - ₹ 4.99 लाख

Magnite XL - ₹ 5.99 लाख

Magnite XV - ₹ 6.68 लाख

Magnite XV dt - ₹ 6.82 लाख

Magnite Turbo XL - ₹ 6.99 लाख

Magnite XV tech pack - ₹ 7.06 लाख

Magnite XV dt tech pack - ₹ 7.20 लाख

Magnite XV Premium - ₹ 7.55 लाख

Magnite Turbo XV - ₹ 7.68 लाख

Magnite XV premium dt - ₹ 7.69 लाख

Magnite Turbo XV dt - ₹ 7.82 लाख

Magnite Turbo CVT XL - ₹ 7.89 लाख

Magnite XV premium tech pack - ₹ 7.93 लाख

Magnite XV PREMIUM dt tech pack - ₹ 8.07 लाख

Magnite Turbo XV dt tech pack - ₹ 8.20 लाख

Magnite Turbo XV premium - ₹ 8.45 लाख

Magnite Turbo XV Premium Opt - ₹ 8.55 लाख

Magnite Turbo CVT XV - ₹ 8.58 लाख

Magnite turbo XV premium dt - ₹ 8.59 लाख

Magnite turbo XV premium opt dt - ₹ 8.69 लाख

Magnite Turbo CVT XV dt - ₹ 8.72 लाख

Magnite Turbo XV premium tech pack - ₹ 8.83 लाख

Magnite Turbo XV premium opt tech pack - ₹ 8.93 लाख

Magnite turbo XV CVT Tech pack - ₹ 8.96 लाख

Magnite turbo XV premium dt tech pack - ₹ 8.97 लाख

Magnite turbo XV premium opt dt tech pack - ₹ 9.07 लाख

Magnite Turbo CVT XV dt tech pack - ₹ 9.10 लाख

Magnite turbo CVT XV Premium - ₹ 9.35 लाख

Magnite turbo CVT XV premium opt - ₹ 9.45 लाख

Magnite turbo CVT XV Premium dt - ₹ 9.49 लाख

Magnite turbo CVT XV prm opt dt - ₹ 9.59 लाख

Magnite turbo CVT PRM XT tech pack - ₹ 9.73 लाख

Magnite turbo CVT XV PRM opt tech pack - ₹ 9.83 लाख

Magnite turbo CVT XV premium dt tech pack - ₹ 9.87 लाख

Magnite Turbo CVT XV PREMIUM opt dt tech pack - ₹ 9.97 लाख