Nissan Magnite Crash Test Report ।। निसान मैग्नाइटने एशियन एनकॅप क्रॅश टेस्ट मध्ये मिळवले 4 स्टार

Nissan Magnite Crash Test Report ।। निसान मैग्नाइटने एशियन एनकॅप क्रॅश टेस्ट मध्ये मिळवले 4 स्टार


निसान या कार कंपनीने आत्ताच भारतीय बाजारात त्यांची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही मैग्नाइट सादर केली आहे. या कारला कंपनीने 4.99 लाख रुपये इतक्या कमीत कमी एक्स शोरूम किंमतीमध्ये लाँच केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही भारतातील सर्वात कमी किंमतीची एसयूव्ही आहे.

आत्ताच एशियन एनकॅप ने या कारची क्रॅश टेस्ट केली आहे आणि आता या क्रॅश टेस्टचे परिणाम समोर आले आहेत. हे परिणाम अगदी चकित करणारे आहेत. या कारणे 4 स्टारची सेफ्टी रेटिंग या टेस्ट मध्ये मिळवलेली आहे. 

सध्या तरी प्रत्येक कॅटेगरी आणि व्हेरियंट नुसार तशी सविस्तर क्रॅश टेस्ट रिझल्ट समोर आलेले नाहीत. निसान फक्त भारतात मैग्नाइटची निर्मिती आणि विक्री करते.

सध्या तरी कंपनीने या कारची परदेशात निर्यात सुरू केलेली नाही. या सर्व गोष्टींना लक्षात घेता भारतात बनवलेल्या आणि विक्रीला असलेल्या निसान मैग्नाइटची टेस्टिंग एशियन एनकॅप टेस्ट मध्ये केलेली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, एशियन एनकॅप क्रॅश टेस्ट मध्ये ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्ट साठी वापरल्या जाणाऱ्या स्पीडवरच ही गाडी चालवली जाते. भारतात आता ग्राहक सुरक्षित गाडी घ्यायला पसंद करतात त्यात आता निसान मैग्नाइट 4-स्टार रेटिंग घेत असेल तर तिच्या मागणीमध्ये आणखी वाढ होईल.

निसान मैग्नाइट भारतात लाँच केल्यानंतर या गाडीची मागणी ही खूप वाढत आहे. लाँच होताच या गाडीचे 15,000 युनिट बुक केले गेले, इतकेच नव्हे तर या गाडीचा वेटिंग पिरियड हा 2 ते 3 महिन्यावर गेला आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की या कारची मेंटेनन्स कॉस्ट ही 29 पैसे/किमी इतकी असेल. हा किंमतीमध्ये ही कार सर्वात कमी खर्चाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही असणार आहे.

कंपनी निसान मैग्नाइटवर 2 वर्ष किंवा 50,000 किमी ची वॉरंटी देते आहे. 

ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही एक्सई( बेस), एक्सएल(मिड)आणि एक्सव्ही (हाय) व एक्सव्ही प्रीमियम व्हेरियंट मध्ये आलेली आहे. या कार मध्ये टेक पॅक सोबत वायरलेस चार्जिंग, एयर प्युरीफायर, एम्बियंट मूड लायटिंग हे फीचर्स दिलेले आहेत. टेक पॅक मध्ये पेडल लॅम्प आणि जेबीएल स्पीकर्स देखील समाविष्ठ केलेले आहेत.

टेक पॅकला धरून मैग्नाइट एकूण 20 व्हेरियंट मध्ये विकली जाते. कंपनीने या कारच्या टॉप मॉडेलची किंमत ही 9.35 लाख रुपये एक्स शोरूम ठेवली आहे.