VW Virtus could come in India !! फॉक्सवैगन वर्टस भारतात होऊ शकते लौंच , वेन्टोला करेल रिप्लेस

VW Virtus could come in India !! फॉक्सवैगन वर्टस भारतात होऊ शकते लौंच , वेन्टोला करेल रिप्लेस


जर्मन कार निर्माता कंपनी फॉक्सवैगनने २०२१ च्या शेवट पर्यंत भारतात एक नवीन मिड साईज सेडान आणण्याची घोषणा केली आहे. म्हणले जाते आहे कि, कदाचित कंपनी त्यांची वर्टस सेडान भारतात घेऊन येऊ शकते. या गाडीची विक्री बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारांत अगोदरपासून केली जात आहे.

याअगोदर बऱ्याच वेळा फॉक्सवैगनच्या वर्टस या सेडानला भारतीय रस्त्यांवर ट्रायल घेताना बघितले गेले आहे. कंपनी या कारला कदाचित एक टेस्ट म्युल म्हणून देखील वापरत असू शकते, जी सध्याच्या वेंटो कारला रिप्लेस करेल.

फॉक्सवैगन वर्टस हि कंपनीच्या एमक्यूबी एओ प्लेटफोर्मवर बनवलेली आहे,या प्लेटफोर्मचा वापर कंपनी त्यांच्या टी-क्रॉस आणि नवीन पोलो या गाड्यांसाठी देखील करते. भारतासाठी बनवल्या जाणारया मोडेलमध्ये कंपनी याच प्लेटफोर्मचा वापर करेल.

सध्या भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या मिड साईज एसयूव्ही फॉक्सवैगन टाइगन याच प्लेटफोर्मवर बनवली आहे. फॉक्सवैगन टाइगन २०२१ च्या मध्यापर्यंत भारतात लौंच केली जाईल. फॉक्सवैगनची हि नवीन सेडान भारतात उपलब्ध असलेल्या हुंडाई वरना , मारुती सुझुकी सियाज आणि होंडा सिटी यासारख्या मिड साईज सेडान कारशी टक्कर देईल. या कारला २ इंजिन पर्यायात उपलब्ध केले जाईल. 

या इंजिन मध्ये पहिले 1.0 लीटर, 3- सिलेंडर टर्बोचार्ज इंजिन, दुसरे 1.5 लीटर, 4-सिलेंडर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन समाविष्ठ असेल. या कारचा 1.0 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन 108 बीएचपी पॉवर आणि 175 न्यूटन मीटर टोर्क देऊ शकते.

गाडीचे 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन १४७ बीएचपी पॉवर आणि २५० एनएम टोर्क देऊ शकते. हिच्या 1.0 लिटर इंजिन ऑप्शन सोबत 6-स्पीड Manual आणि टोर्क कन्व्हर्टर औटोमेटिक गियरबॉक्स दिला जातो. 

या कारच्या 1.5 लिटर इंजिन सोबत 7-स्पीड डीएसजी ऑटोमेटिक गियरबॉक्स दिलेला आहे. नवीन फॉक्सवैगन वर्टस मध्ये कंपनी 2,500 मिमी व्हीलबेस देते, जो नवीन पोलो पेक्षाहि 80 मिमी ने जास्त आहे.

कंपनी आपल्या या मध्यम आकाराच्या सेडान मध्ये डीसेंट कम्फर्ट आणि फीचर्स देते. हिच्या डेशबोर्ड मध्ये 10.25 इंचाचा All-Digital Active इन्फो डिस्प्ले दिलेला आहे. यात 8 इंचाची infotenment touchscreen system दिलेली आहे.

ही टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम Android auto, apple carplay सोबत कनेक्ट होऊ शकते. याशिवाय Automatic Cliemet Control, लेदर सीट्स आणि मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील दिलेली आहे.