जाणून घ्या कशी आहे मारुती सुझुकी विटारा ब्रेजा ।। Maruti Suzuki Vitara Brezza Review

जाणून घ्या कशी आहे मारुती सुझुकी विटारा ब्रेजा ।। Maruti Suzuki Vitara Brezza Review


2016 मध्ये लाँच नंतर मारुती सुझुकी विटारा ब्रेजा ही सब 4 मीटर एसयूव्ही सेगमेंट मध्ये सर्वात लोकप्रिय ठरली.लाँच झाली तेव्हा ही कार फक्त डिझेल सेगमेंट मध्ये आली होती. परंतु कंपनीने मार्च 2020 मध्ये फेसलिफ्ट अपडेट देत या कारला पेट्रोल इंजिन सोबत देखील समोर आणले. ही फेसलिफ्ट अपडेट असल्यामुळे डिझाईनमध्ये थोडेफार अपडेट हे होणारच होते. चला तर मग सविस्तर पने जाणून घेऊयात कशी आहे ब्रेजा 2020:Exterior of Maruti Suzuki Vitara Brezza


2020 विटारा ब्रेजा पेट्रोल पहिल्या नजरेत अगदी जुन्या मॉडेलसारखीच आहे.  परंतु लक्ष दिल्यावर कंपनीने यात थोडेफार बदल केलेले आहेत हे लक्षात येते. गाडीच्या फ्रंट प्रोफाईलची गोष्ट येते तेव्हा यात नवीन ब्लेड क्रोम ग्रील दिलेली आहे. कारच्या हेडलॅम्पची बनावट जवळपास तशीच आहे, परंतु आता यात डबल बॅरेल एलईडी लाईट दिलेले आहेत. हेडलॅम्प मध्येच इंटिग्रेटेड एलईडी डीआरएल दिलेले आहेत. हेच डीआरएल टर्न इंडिकेटरचे काम देखील करतात. नवीन अपडेट सोबत कारचे बंपर आणि डिझाईन मध्ये थोडेफार चेंज हे केलेले आहेत. या कारमध्ये आता एलईडी फॉग लॅम्प दिले गेले आहेत. ब्लॅक क्लेडिंग सोबत असणाऱ्या फॉग लॅम्प हाऊसिंग मध्ये हॉरीझोनटल लाइनिंग पॅटर्न दिलेला आहे. याशिवाय गाडीच्या बंपरवर मिळणारे सिल्व्हर रंगाचे फॉक्स स्कीड प्लेट कारच्या फ्रंट लुकला अधिक दमदार बनवतात.

(Brezza review in marathi/ Kashi ahe vitara brezza glamours car)

कारची साईड डिझाईन ही तिच्या प्रि फेसड मॉडेल सारखीच आहे. या नवीन मॉडेल मध्ये 16 इंचाचे नवीन अलॉय व्हील दिलेले आहेत. फेसलिफ्ट सोबत कंपनीने कार मध्ये तीन नवीन ड्युअल टोन आणि दोन नवे मोनोटोन कलर्स सादर केले आहेत. 


यात मेटॅलिक सिझलिंग रेड सोबत मिडनाईट ब्लॅक रुफ, ब्ल्यू दोबत मिडनाईट ब्लॅक रुफ आणि ग्रॅनाईट ग्रे सोबत ऑटमऑरेंज रुफ हे ड्युअल टोन आणि मेटॅलिक सिझलिंग रेड आणि टार्क ब्ल्यू हे मोनोटोन कलर आहेत. हे ड्युअल टोन एक्सटिरियर पेंट कारच्या कॉन्ट्रास्टला आणखी निखरतात.

रियर साईडला कंपनीने फेसलिफ्ट अपडेट सोबत फक्त टेललॅम्प मध्ये एलईडी एलिमेंट्स दिलेले आहेत. रियर बंपरवर देखील फॉक्स स्कीड डिझाईनमध्ये थोडासा बदल केलेला आहे. याशिवाय कारच्या ऑटोमॅटिक व्हेरीयंट मध्ये टेलगेटवर हायब्रीड ब्रॅण्डडिंग दिलेली आहे.


एकूणच फेसलिफ्ट विटारा ब्रेजा पेट्रोलची डिझाईन हिच्या जुन्या डिझेल मॉडेल सारखीच आहे. परंतु मॉडर्न ट्रेंड अनुसार कंपनीने यात एलईडी लायटिंग दिलेली आहे. परंतु या छोट्याश्या बदलांना लक्षात घेता ही माईल्ड फेसलिफ्ट म्हणता येईल.


लांबी : 3995 मिलिमीटर

रुंदी: 1790 मिलिमीटर

उंची: 1640 मिलिमीटर

व्हीलबेस: 2500मिलिमीटर

ग्राऊंड क्लियरन्स: 198 मिलिमीटर

बूट स्पेस: 328 लिटरइंटिरियर आणि इतर फीचर्स ( interior of vitara brezza)

विटारा ब्रेजा पेट्रोलचे इंटिरियर हे तिच्या डिझेल मॉडेल सारखेच आहे. यात देखील थोडेफार फीचर्स हे ऍड केले आहेत.


ब्रेजा मध्ये ऑल ब्लॅक केबिन मिळते. कारच्या एक्सटिरियर प्रमाणे एक बॉक्सि चौकोनी आकाराची डिझाईन आपल्याला कारच्या डॅशबोर्ड मध्ये बघायला मिळते. कलर कॉन्ट्रास्ट साठी कारचे ग्लोव बॉक्स, स्टीयरींग व्हील आणि डोअर पॅड वर सिल्व्हर हायलाईट बघायला मिळतात. गाडीच्या साईड एसी व्हेंट आणि सेंट्रल कंट्रोल च्या चारही बाजूने आपल्याला पियानो ब्लॅक फिनिशिंग बघायला मिळते. कंपनीने फेसलिफ्ट अपडेट सोबत नवीन फॅब्रिक अपहोलस्ट्री दिली आहे. सोबतच यांच्या 7 इंचाच्या स्मार्टप्ले इन्फोटेन्मेंट सिस्टमला देखील अपडेट केले आहे. आता हे आपल्या स्मार्टफोनला क्लाउड कनेक्टिव्हिटी सिस्टमने कनेक्ट होऊ शकते. परंतु ब्रेजाच्या कंपिटीटर कार टाटा नेक्सन, फोर्ड इको स्पोर्ट, ह्युंदाई वेन्यू इत्यादी मध्ये इंटिग्रेटेड इन्फोटेन्मेंट च्या जागी फ्लोटिंग युनिट सिस्टम मिळते. मारुतीच्या या फेसलिफ्ट मध्ये फ्री स्टँडिंग इन्फोटेन्मेंट सिस्टम  आणि सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सादर केले आहे. यासोबत या कारमध्ये ऑटो डिमिंग आईआरविएम, क्रुज कंट्रोल आणि हिल असिस्ट यासारखे फीचर्स दिलेले आहेत. ज्यामुळे आता ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स अधिक चांगला होईल. 


अन्य फीचर्स विषयी बोलायचे झाले तर यात स्टीयरिंग माऊंटेड ऑडिओ आणि टेलिफोन कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अडजेस्टेबल ओआरव्हिएम, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, एपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, टिल्ट अडजेस्टेबल स्टीयरिंग व्हील, हाईट अडजेस्टेबल ड्रायव्हिंगसीट असे बरेच फीचर्स मिळतात.

एका गोष्टीची कमी फेसलिफ्ट अपडेट मध्येही जाणवते कारण कंपनीने अजूनही कारच्या मटेरियल क्वालिटी मध्ये सुधारणा केलेली नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी हार्ड प्लास्टिक आणि पार्ट शेरिंग बघायला मिळते.


कारच्या सिटिंग आणि स्पेसची गोष्ट येते तेव्हा यात क्वालिटी आणि कुशनिंग मस्तच आहे. कारच्या फ्रंट सीटला हाई पोसिशनिंग दिलेली आहे. यातील ड्रायव्हर सीटची हाईट आपण मॅन्युअली ऍडजस्ट करू शकतो. यामध्ये हेडरूम, बॅक सपोर्ट आणि थाई सपोर्ट विषयी कोणतीही समस्या येणार नाही.सोबतच ड्रायव्हर आणि को पेसेंजर सीटला अडजेस्टेबल हेडरेस्ट दिलेली आहे.

मागील सीट्स ची गोष्ट येते तेव्हा पुढील सीट्स प्रमाणे कम्फर्ट आहे. यामध्ये तुम्हाला निरुम, लेगरूम आणि हेडरूम यांची कमतरता कधी जाणवणार नाही. पॅसेंजरच्या कम्फर्ट साठी सेंटर आर्मरेस्ट आणि विंडोसीटला एडजेस्टेबल हेडरेस्ट मिळते.मिडल सिटीचा थोडासा कम्फर्ट च्या बाबतीत प्रॉब्लेम आहेच.


यामध्ये रियर एसी व्हेंट, सनरुफ, आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यासारख्या फिचर्सची कमतरता आहे. 

सेफ्टीच्या अनुषंगाने या कारच्या सर्व व्हेरियंट मध्ये ड्युअल फ्रंट एयर बॅग, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम यासोबत इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, आईइसओ फिक्स चाईल्ड सीट माउंट, रियर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम यासारखे फीचर्स मिळतात. 

त्यासोबत टॉप व्हेरीयंट मध्ये रिव्हर्स कॅमेरा आणि ऑटोमॅटिक व्हेरीयंट मध्ये हिल होल्ड असिस्ट हे फिचर मिळते. मिळालेल्या माहितीनुसार विटारा ब्रेजा च्या प्रि फेसलिफ्ट मध्ये ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टच्या ऍडल्ट पॅसेंजरच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 4 स्टार मिळवले आहेत. ही रेटिंग मारुतीच्या सर्व गाड्यांपैकी सर्वात जास्त आहे.


स्टोरेज स्पेसच्या बाबतीत या कार मध्ये कोणतीही कमतरता नाहीये. ट्वीन ग्लव बॉक्स, दोन्ही फ्रंट आणि रियर डोअर मध्ये बॉटल होल्डर, सेंट्रल कंट्रोल टनल मध्ये 2 कप होल्डर,  हॅण्डब्रेकच्या जवळ छोटीशी स्टोरेज स्पेस, फ्रंट आर्मरेस्टजवळ एक छोटीशी स्टोरेज आणि रियर सेंटर आर्मरेस्ट वर कप होल्डर ची जागा मिळते. सोबतच ड्रायव्हर सीटच्या मागील बाजूस यांचे कोट हुक देखील बघायला मिळते. कारच्या बूट स्पेसची क्षमता ही 328 लिटर आहे, जी एक्सयूव्ही 300 पेक्षा जास्त आहे परंतु या सेगमेंटच्या इतर कार पेक्षा कमी आहे. या कारच्या मागच्या सिट्सची 60:40 फोल्डिंग होते त्यामुळे आपण लगेज स्पेस फोल्ड करून वाढवू शकतो. 

इंजिन परफॉर्मन्स( Maruti Suzuki Vitara Brezza Engine Performance)


2020 फेसलिफ्ट सोबत विटारा ब्रेजा ने त्यांचे जुने 1.3 लिटर डिझेल इंजिन बंद करत सियाज चे नवीन 1.5-लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन सादर केले आहे. या इंजिन सोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिलेला आहे. ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येणाऱ्या गाडीत माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी वापरून आपले मायलेज वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 


इंजिन: 1.5 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन

इमिशन नॉर्मस: बीएस6

अधिक टॉर्क: 138 न्यूटन मीटर

अधिकतम पॉवर: 105 बीएचपी

गियरबॉक्स ऑपशन: 5-स्पीड मॅन्युअल / 4 स्पीड ऑटोमॅटिक


कार सुरू करताना खूप कमी आवाज येईल, आयडलिंग व्हायब्रेशन देखील इतर डिझेल मॉडेल पेक्षा खूप कमी येईल. हे इंजिन ब्रेजा अगोदर एक्सएल 6 आणि सियाज मध्ये दिले आहे. इंजिनची पॉवर डिलिव्हरी कमालीची आहे आणि मिड रेंज मध्ये तर याचा परफॉर्मन्स उत्तमच आहे. आपण न थकता ही कार दिवसभर चालवू शकता.मारुतीने या कारच्या इंजिनची आणि गियरबॉक्स ची ट्युनिंग अगदी योग्य केलेली आहे ज्यामुळे दुसऱ्या गियर वर ही कार 40 चा स्पीड आरामात घेते. यावेळी तुम्हाला इंजिनवर लोड देखील जाणवत नाही जी गोष्ट सिटी ड्रायव्हिंग साठी उत्तम आहे. एव्हढेच नाही तर हाय गियरवर देखील ही कार अगदी कमी स्पीड वर न बंद पडता चालू शकते जी गोष्ट सिटी ड्रायव्हिंग साठी आणखी एक प्लस पॉईंट आहे. 

हायवे वर कार 3 डिजित स्पीड सहज क्रॉस करते. या कारमध्ये क्रुज कंट्रोल फिचर मिळते ज्यामुळे थ्रोटलींग पासून आपली सुटका होते. या कारच्या ऑटोमॅटिक गियरबॉक्स ची गोष्ट येते तेव्हा हीच परफॉर्मन्स अगदी उच्च दर्जाचा आहे. सिटी स्पीडमध्ये ही अतिशय उत्तम पने तिचे काम करते. हाय स्पीड मध्ये 4 स्पीड गियर असल्याने ओव्हरटेक करताना किंवा चढाईचे रस्ते चढताना प्रॉब्लेम ही कार देते.

या कारमध्ये ऑटोमॅटिक पॉवरट्रेन सोबत स्मार्ट माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी देखील मिळते जी आयडलिंग किंवा कार उभी राहण्याच्या स्थितीमध्ये इंजिन बंद करते ज्यामुळे विनाकारण वापर होणाऱ्या इंधनाची बचत होते. ऑन रोड मायलेजची गोष्ट येते तेव्हा सिटी मध्ये ही कार 14 किमी/लिटर तर हायवे वर 16-17किमी/लिटर देते.राईड क्वालिटी (Ride Quality Vitara Brezza)

विटार ब्रेजाची राईड क्वालिटी ही उत्कृष्ट आहे. रस्त्यावरील खड्डे आणि स्पीड ब्रेकर्स ही कार केबिनमध्ये जाणवू देत नाही. कारची हँडलिंग चांगली आहे आणि हीची स्टीयरिंग आपल्याला गरजेचा फीडबॅक हा देते. सिटी ड्रायव्हिंग मध्ये कमी स्पीड असताना थोडीशी सैल स्टीयरिंग वाटते परंतु हायवेवर एकदा स्पीड मिळाल्यावर आपल्याला आणखी कॉन्फिडन्स येतो.


Pro's of Vitara Brezza

रिफाईन पेट्रोल इंजिन

फन-टू-ड्राइव्ह परफॉर्मन्स

चांगली राईड क्वालिटी


Con's of Vitara Brezza

डिझेल इंजिनची कमतरता- या सेगमेंटच्या इतर सर्व गाड्या या बीएस6 सोबत पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन सोबत उपलब्ध आहेत.

कंपिटीटर गाड्यांमध्ये सनरुफ, रियर एसी व्हेंट्स,  फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट युनिट, कनेक्टेड टेक्नॉलॉजी आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहेत ज्या या कारमध्ये नाहीत.

सुरक्षा दृष्टीकोनातून साईड व कर्टन एयरबॅग्सची कमतरता आहे. 

प्लास्टिक क्वालिटी खूप साधारण आहे.

Image Credits- www.cardekho.com