Mahindra wins battle with Jeep in US ।। महिंद्राने रॉक्सरच्या विक्रीमध्ये जीप ला देखील हरवले

Mahindra wins battle with Jeep in US ।। महिंद्राने रॉक्सरच्या विक्रीमध्ये जीप ला देखील हरवले


महिंद्रा आणि जीप या दोन्ही कंपन्या खूप दिवसापासून एकमेकांवर कॉपी करण्याचे आरोप करताय. काही काळापूर्वीची गोष्ट म्हणजे जीप कंपनीने महिंद्रा कंपनीवर जीप रँगलर ची डिझाइन कॉपी करून महिंद्रा रॉक्सर बाजारात आणल्याचा आरोप केला होता. 

आपल्याला सांगावे वाटते की जीप कंपनीने महिंद्राच्या रॉक्सर गाडीच्या विक्रीला बंदी आणण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु सध्या आलेल्या निर्णयाने महिंद्रा रॉक्सरच्या विक्रीला परवानगी दिलेली आहे. 


रॉक्सरला अमेरिकन बाजारात एक उत्तम आणि विश्वासक एसयूव्ही म्हणून विकले जात आहे. ही रॉक्सर अनेक कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी सज्ज तर आहेच परंतु रँगलर पेक्षा अगदी कमी किमतीत ही गाडी अमेरिकेत उपलब्ध आहे. 

परंतु आता या गाडीच्या डिझाइन मध्ये वाद कोठे आहे? जीप कंपनीचे म्हणणे आहे की रॉक्सरची डिझाइन ही त्यांच्या रँगलर आणि पालकत्व असलेली कंपनी फिएट क्रिसलर ऑटोमोबाईलची एक नक्कल आहे, ज्याच्यामुळे जीप कंपनीने या रॉक्सर च्या विक्रीला प्रतिबंध घालण्याची मागणी केली होती. 


यासाठी जीपने कोर्टाच्या मार्गाने महिंद्राला अडकवले होते. परंतु एका मीडिया रिपोर्टच्या अनुसार यूएस इंटरनेशनल ट्रेड कमिशन ने महिंद्रा रॉक्सर एसयूव्ही च्या विक्रीला परवानगी दिलेली आहे.

आयटीसीच्या मते महिंद्रा रॉक्सर ची डिझाइन ही कुठल्याही प्रकारे जीप रँगलरच्या डिझाईनच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांचे उल्लंघन करत नाही. सांगू इच्छितो की एसयूव्ही निर्माता जीप कंपनीने काही खास गोष्टींवर लक्ष नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जीपचे म्हणणे आहे की जीप रँगलरची बॉक्सिंग बॉडी शेप, गोल हेडलाईट आणि फ्रंट ग्रील ब्रँडची वेगळी ओळख आहेत. जीपच्या या आरोपानंतर महिंद्राने देखील आपले म्हणणे स्पष्ट केले होते.


महिंद्रा म्हणाले होते की, महिंद्राने रॉक्सर या आपल्या नवीन वाहनाला ऑफ- रोड साठी तयार केले गेले आहे. महिंद्राला आजही रॉक्सरच्या 2021 मॉडेल बनवायला आणि विकायला परवानगी आहे.

महिंद्राच्या या उत्तरानंतर एफसीए ग्रुप नाराज आहे. ते म्हणाले की एफसीए रिडिझाईनच्या संबंधात आयोगाच्या निर्णयावर आम्ही निराश आहोत, आम्हाला विश्वास आहे की आम्ही या निर्णयाविरोधात पुन्हा अपील करू आणि पुढील निर्णय आमच्या बाजूने असेल.