Mahindra Thar 6 seater varient discontinued ।। महिंद्रा थार चे 6 सीटर व्हेरियंट का बंद झाले?
Mahindra Thar 6 seater varient discontinued ।। महिंद्रा थार चे 6 सीटर व्हेरियंट का बंद झाले?
भारतीय एसयूव्ही कंपनि महिंद्रा अँड महिंद्रा ने त्यांची ऑफरोड एसयूव्ही महिंद्रा थार 2020 भारतात ऑक्टोबरमध्ये लाँच केली होती. लाँच नंतर भारतातील ग्राहकांनी या गाडीला खूप मोठ्याप्रमाणात आणि उदंड प्रतिसाद दिला. या गाडीची बुकिंग देखील खूप जास्त प्रमाणात झाली.
सांगू इच्छितो की या गाडीसाठी प्रतिसाद इतका उत्कृष्ट आहे की या गाडीची म्हणजेच नवीन 2020 महिंद्रा थारची मे 2021 पर्यंतची बुकिंग आजच्या घडीला झालेली आहे. त्यामुळे आता महिंद्रा आपल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे.
आता या एसयूव्हीच्या बाबतीत एक नवीन गोष्ट समोर येत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी आपल्या थार 2020 मॉडेल पैकी 6 सीटर व्हेरियंट आता बंद करणार आहे, यामागील कारण म्हणजे महिंद्राच्या थार 6 सीटर मध्ये 4 सीटर पेक्षा सुरक्षितता कमी आहे.
महिंद्राने आत्ताच क्रॅश टेस्ट साठी ग्लोबल एनसिपी कडे आपली थार पाठवली होती. जिथे या थार ने सुरक्षा आणि पॅसेंजर सेफ्टीच्या बाबतीत 4 स्टार मिळवले आहेत. आता महिंद्राने ऑफिशियली त्यांचे 6 सीटर व्हेरियंट बंद केले आहे.
महिंद्राने आता आपल्या अपडेटेड थारसाठी एक ब्रोशर बनवले आणि प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये कंपनीने एएक्स स्टॅंडर्ड (6-सीटर) ला घेतलेले नाहीये. याचाच अर्थ असा की आता महिंद्रा थार फक्त 4 सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
मागील प्रवाशांना आता पुढच्या बाजूला तोंड असलेली सीट दिली जाईल. त्याला सीट बेल्टस असल्याने बेंच सीट्स पेक्षा ही खूप जास्त सुरक्षित असेल. महिंद्राने क्रॅश टेस्टचे रिझल्ट समोर येताच एएक्स 6 सीटरची बुकिंग बंद केली होती.
नवीन एनसिपी टेस्टच्या निर्णायक निकालानंतर महिंद्राने आपले 6 सीटर थार व्हेरियंट बंद करण्याची योजना आखली होती. सध्या थार 2020 नवीन सिल्व्हर कलर मध्ये टेस्टिंग करत असल्याचे काही फोटो आले होते.
महिंद्रा थार 2020 सिल्व्हर कलर ऑपशन मध्ये ऑफिशियली उपलब्ध नाहीये. परंतु या कलर ऑपशन मध्ये होत असलेली टेस्टिंग समोर आल्यानंतर असे वाटते की लवकरच महिंद्रा या कलरचा देखील विचार करत आहे.
या टेस्टकडे बघता कदाचित महिंद्रा आणखी काही कलर ऑपशन मध्ये थारला घेऊन येऊ शकते किंवा फक्त सिल्व्हर कलर ऑपशन थार मध्ये बघायला मिळेल.
महिंद्राने थारला 2.0-लिटर पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल या दोन इंजिन ऑपशन मध्ये दिलेले आहे. पेट्रोल इंजिन हे 150 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क देते, तर डिझेल इंजिन 130 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क देते.
टिप्पणी पोस्ट करा