Tips for Second hand bike Purchase ।। जुनी बाईक घेताना या गोष्टी नक्की बघा

Tips for Second hand bike Purchase ।। जुनी बाईक घेताना या गोष्टी नक्की बघा


आपण जर कमी पैशात चांगली बाईक घ्यायची असेल तर जुन्या गाड्यांकडे वळतो. परंतु सेकंड हँड बाईक मध्ये नवीन बाईक सारखा अनुभव नसतो परंतु सेकंड हँड बाईक मध्ये आपले काम होत असेल तर घ्यायला मुळीच हरकत नसावी. बरेचसे लोक जुनी गाडी विकत घेताना काही गोष्टी बघत नाहीत त्यामुळे गाडी आपल्या हातात आल्यानंतर काही दिवसातच तिचे खरे रूप दाखवायला लागते आणि आपल्याला संकटांचा सामना करावा लागू शकतो.

बऱ्याच वेळा स्वस्तात घेतलेली एखादी बाईक चोरीची असू शकते आणि ज्यामुळे आपण काही चूक नसताना आपल्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे आजच्या या काही गोष्टी तुम्ही वेळ देऊन जाणून घेतल्या तर तुम्हाला पुढे गाडीचे इंजिन देखील धोका देणार नाही आणि स्वतःला निर्दोष देखील सिद्ध करावे लागणार नाही.

शोध घ्या

शोध घ्या म्हणजे आपण जी गाडी घ्यायला जाणार आहोत तिच्याविषयी थोडी माहिती करून घ्या. ती बाईक सध्या चालू आहे का याची खात्री कंपनीच्या वेबसाईटवर करून घ्या जेणेकरून जर ते मॉडेल कंपनी ने बंद केलेल असेल तर तुम्हाला कळून जाईल. कारण बंद केलेल्या मॉडेलचे स्पेअर पार्टस मिळणे बऱ्याचदा कठीण होऊ शकते. बाईक बघायला गेल्यावर ती बाईक मोडीफाय किंवा काही अल्टर तर केलेले नाही ना याची खात्री करून घ्या. बाईक जर मोडीफाय केलेली असेल तर तिची वोरंटी संपलेली असते, ही गोष्ट लक्षात ठेवा.

बाईक अपघातग्रस्त तर नाहीये?

सेकंड हँड बाईक घेताना तिची डिझाइन तपासून बघा, गाडीवर कुठे स्क्रॅच वैगेरे नाहीये याची खात्री करा.  बाईकवर कुठे अपघाताचे संकेत नाहीयेत ना याची खात्री करून घ्या. बाईक कुठे वाकडी अथवा ठोकलेली नाहीये ना याची जाणीव करून घ्या. यासाठी बाईकचे रिम, सॉकर आणी हँडल नीट तपासून बघा, त्यावरून लगेच कळू शकते.

बाईक स्टार्ट करून बघा

एक्सपर्ट सांगतात की बाईक घेताना नेहमी किक वर सुरू करून बघावी, ज्यामुळे आपल्याला इंजिनमध्ये काही दोष असेल तर लगेच कळते. जर बाईक स्टार्ट होण्यासाठी 2 ते 3 किक पेक्षा जास्त घेत असेल तर बाईकच्या इंजिनमध्ये काहीतरी खराबी नक्की असावी. परंतु थंडीच्या दिवसात असाल तर 4 ते 5 किक देखील बाईक सुरू होण्यासाठी घेऊ शकते. 

चेसी आणि इंजिन नंबर बघून घ्या

जुनी गाडी घेताना सर्वात आधी गाडीचा चेसी नंबर आणि इंजिन नंबर एकदा तपासून बघा, त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वरती जुळवून बघा. ऑनलाइन सेकंड हँड बाईक खरेदी करताना बऱ्याचदा ग्राहकाला बाईक बदलून दिली जाते.  बाईकच्या नंबर प्लेटला बाईकच्या लायसन्स सोबत जुळवून नक्की बघितले पाहिजे. बाईकचा इन्शुरन्स असेल तर कंपनी कडे कॉन्टॅक्ट करून त्या गाडीचा अपघात तर झालेला नाहीये ना याची खात्री करून घ्या. जवळील आरटीओ ऑफिस मधून तुम्ही बाईकची माहिती देखील प्राप्त करू शकता.

मेंटेनन्स रेकॉर्ड

बाईकचा मेंटेनन्स रेकॉर्ड मालकाकडून घ्यायला विसरू नका. बाईकची वेळेत सर्व्हिसिंग झालेली आहे की नाही याची खात्री करून घ्या. जर रेकॉर्ड नसेल तर किती सर्व्हिसिंग वर्षाला होतात याची माहिती घ्या.

टेस्ट राईड

बाईक ज्याला वापरायची आहे त्याने आणि ज्याला बाईक मधलं कळत त्याने नक्की चालवून बघावी. टेस्ट राईड घेताना बाईकचे क्लच, गियर, एक्सलरेटर, सस्पेंशन, इंडिकेटर, हेडलाईट, टेललाईट आणि हँडल कसे आहेत हे नक्की बघून घ्या. चालवताना बाईक एका बाजूला तर ओढत नाहीये ना किंवा कुठून आवाज तर येत नाहीये ना याची खात्री करावी.

व्यवहार आणि भाव करणे

जुनी बाईक घेताना मालकासोबत भाव करायला मागे पडू नका. बाईक ची कंडिशन, परफॉर्मन्स आणि चालते कशी यावरून तुम्ही तिची किंमत मालकाला सांगावी. सर्व योग्य असेल तर डिल पक्की करावी आणि मालकाला पैसे देताना गाडी नावावर करण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घ्यायला विसरू नये.