Sonalika Tractor Sales December 2020 !! सोनालिकाने डिसेंबर मध्ये विकले 11,540 ट्रॅक्टर

Sonalika Tractor Sales December 2020 !! सोनालिकाने डिसेंबर मध्ये विकले 11,540 ट्रॅक्टर


सोनालिका ट्रॅक्टर ने शुक्रवारी डिसेंबर 2020मधील। विक्रीचे आकडे समोर आणले आहे. कंपनीने 2020 डिसेंबर मध्ये। 57.65 % बढत घेत एकूण 11,540 युनिट ट्रॅक्टर विकले आहेत. कंपनीने 2019 मध्ये एका महिन्यात एकूण घरेलू आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 7,320 ट्रॅक्टर विकले आहेत. 

सोनालिका ने सांगितले की चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते डिसेंबर) कालावधी मध्ये 1,04,454 युनिट ट्रॅक्टर विकले आहेत. 2019 वर्षाच्या या कालावधी मध्ये विक्रीच्या मध्ये 33% वाढ झालेली दिसते. कंपनीची ही डिसेंबर मध्ये सर्वाधिक विक्रीची नोंद करत ट्रॅक्टर बाजारात 16% हिस्सेदारी बनवली आहे. 


सोनलिकाने विक्रीचे आकडे जाहीर करताना आनंदाने सांगितले की या आर्थिक वर्षाच्या 9 महिन्यामध्ये 1 लाखाहून अधिक ट्रॅक्टरची विक्री केलेली आहे. हे सोनलिकाचे ट्रॅक्टर, त्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे हे शक्य झाले आहे. कंपनी प्रत्येक वर्षी ट्रॅक्टर इंडस्ट्री मध्ये 33% वाढ करत आहे, हे केवळ सोनलिकाच्या क्वालिटी आणि सर्व्हीसमुळे शक्य झाले आहे. 

सोनालिकाने मागील महिन्यात देशातील पहिला फिल्ड रेडी ई ट्रॅक्टर टाईगर लाँच केला आहे. कंपनीने हे देखील सांगितले की मागील 3 महिन्यांत दरवर्षी जवळपास 1 लाखाहून अधिक ट्रॅक्टर कंपनी विकते. 


सोनालिका ट्रॅक्टर 20 ते 120 हॉर्सपॉवर या रेंजमध्ये ट्रॅक्टरची निर्मिती करते. सध्याच्या काळात कंपनी 70 हुन अधिक कृषी औजारे व वाहनांची निर्मिती करते आहे. कंपनीने सांगितले की कृषी क्षेत्रात होणारी प्रगती हे ट्रॅक्टरच्या जास्तीत जास्त विक्रीचे कारण आहे.

कंपनीने सांगितले की लोकडाऊन संपल्यानंतर ट्रॅकरच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे.कंपनी लॉकडाऊन नंतर ट्रॅक्टरच्या मागणी नुसार उत्पादन करत आहे. कंपनीने सांगितले की कोरोना महामारी मुळे विक्रीच्या प्रमाणात घट झाली होती परंतु याचा जास्त परिणाम शेती क्षेत्रात झाला नव्हता.

लोकंडाऊन संपल्यानंतर कंपनीने पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू केले आहे. या आकड्यांना बघून समजते की कृषी क्षेत्रात वाहनाची होणारी विक्री ही लॉकडाऊन नंतर वाढली आहे. लॉकडाऊन मुळे कार विक्री जवळपास 80-90% घटली होती परंतु याचा परिणाम ट्रॅक्टर क्षेत्रावर जाणवला नाही. 


नवीन वर्षात सर्व वाहन कंपनी आपल्या किमती वाढवणार आहेत. आता या लिस्ट मध्ये ट्रॅक्टर आणि कमर्शियल वाहन बनवणाऱ्या कंपन्या देखील सामाविष्ठ झालेल्या आहेत. महिंद्राच्या ट्रॅक्टर प्रभागाने देखील जानेवारी पासून किंमत वाढवण्याची घोषणा केलेली आहे. 

कंपनीने सांगितलें की बनवण्याच्या खर्चात वाढ झाल्याने किमती वाढवाव्या लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या ट्रॅक्टर व्यापारात एक चांगली उंची गाठलेली दिसते. कंपनीने नोव्हेंबर 2020 मध्ये 31,619 युनिट्स विकले होते.