Royal Enfield Sales Dec 2020!! रॉयल एनफिल्ड ने इसेंबर मध्ये विकल्या 65,492 टू-व्हीलर

Royal Enfield Sales Dec 2020!! रॉयल एनफिल्ड ने इसेंबर मध्ये विकल्या 65,492 टू-व्हीलर


प्रीमियम बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड ने डिसेंबर 2020 च्या विक्री रिपोर्ट जाहीर केला आहे. कंपनीने डिसेंबर मध्ये 35% विक्री वाढवून 65,492 टू-व्हीलर बाईक्स विकल्या आहेत. तसेच कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये 3,503 युनिट्स एक्स्पोर्ट देखील केले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये घरेलू आणि एक्स्पोर्ट अशे 68,995 युनिट विक्री करून 37% वाढ केली आहे.

2019 मध्ये या महिन्याची एकूण विक्री ही 50,416 युनिट इतकी होती. कंपनी आता त्यांची प्रसिद्ध बाईक मॉडेल क्लासिक 350 चे नवीन व्हेरियंट घेऊन येण्याच्या तयारीत आहे. ही बाईक बऱ्याच वेळा रोड टेस्टिंग करताना आढळली आहे. कंपनीने क्लासिक 350 लाँच केल्यानंतर यामध्ये जास्त काही बदल केलेलं नाहीत.

परंतु आता ग्राहकांच्या मागणीला विचारात घेता आणि बाईकला नवीन ट्रेंडला धरून ठेवण्यासाठी कंपनी यात काही बदल करत आहे. भारतात 350 सीसी क्रूझर सेगमेंट मध्ये रॉयल एनफिल्ड क्लासिक आणि बुलेट 350 चे वर्चस्व आहे. परंतु होंडा हाईनेस आणि जावा सारखे मॉडेल क्लासिक 350 च्या विरोधात समोर आलेले आहेत.

आता बजाज देखील त्यांची क्रूझर बाईक न्यूरॉन घेऊन बाजारात उतरण्याची योजना बनवत आहे. परंतु अधिकारीक दृष्ट्या बजाजने अजून याची घोषणा केलेली नाही.

रॉयल एनफिल्ड ने नवीन क्लासिक 350 या वर्षी सण-उत्सवांच्या काळात लाँच करण्याची योजना बनवली होती परंतु कोरोना महामारीच्या मुळे उशिरा होणारे उत्पादन आणि सप्लाय मधील अनियमितता यामुळे कंपनीला लाँच टाळावा लागला. परंतू आता कंपनी पूर्णपणे या क्लासिक 350 च्या लौंचसाठी तयार आहे.

रॉयल एनफिल्ड त्यांची 650 सीसी ची पॉवरफुल बाईक इंटरसेप्टर चे 350 सीसी मॉडेल देखील घेऊन येणार आहे. ही बाईकदेखील सध्या टेस्टिंग दरम्यान बघितली गेली आहे. 

यावरून हे साफ स्पष्ट होते आहे की कंपनी 350 सीसी सेगमेंटमध्ये त्यांचे वर्चस्व कायम ठेवणार आहे. 

मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये लाँच केलेली रॉयल एनफिल्ड मेटीओर ची देखील विक्री आणि बुकिंग जोरदार सुरू आहे. कंपनीने लाँचच्या पहिल्या महिन्यातच या बाईकचे 7,031 युनिट विकले होते. नोव्हेंबरच्या विक्री मध्ये ही कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी दुसरी बाईक होती.

रॉयल एनफिल्ड मिटीओर 350 हे कंपनीचे पूर्णपणे नवे मॉडेल आहे, हिला नवीन जे-प्लॅटफॉर्मवर बनवले गेले आहे. यामध्ये नवीन 349 सीसी इंजिन लावले आहे. सोबतच हिला नवीन डिझाईन व ग्राफिक्स दिले गेले आहेत. या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युईल इंजेक्शन सोबत 5-स्पीड गियरबॉक्स दिलेला आहे. 

एक रिपोर्ट अनुसार 251-500 सीसी सेगमेंट मध्ये बाजारात रॉयल एनफिल्ड 95% हिस्सेदारी ठेवते. सध्याच्या काळात अनेक बाईक निर्माता कंपन्या जसे होंडा, महिंद्रा, टिव्हीएस, यामाहा, बजाज, केटीएम, जावा आणि कावासाकी 251 ते 500 सीसी दरम्यान बाईक विक्री करत आहेतं.

इतके असताना देखील बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड या सेगमेंट मध्ये राज्य करते आहे. एप्रिल ते नोव्हेंबर मधील विक्रीमध्ये रॉयल एनफिल्ड चे वर्चस्व दिसून येते.

251 सीसी ते 500 सीसी या सेगमेंट मध्ये रॉयल एनफिल्ड ने 8 महिन्यामध्ये एकूण 3,11,388 बाईक युनिट विकले आहेत. विक्रीच्या 70% हिस्सा हा केवळ एक बाईक क्लासिक 350 चा आहे.