Upcoming Electric Cars In India ।। भारतात पुढील वर्षी येणाऱ्या इलेक्ट्रिक कार

Upcoming Electric Cars In India ।। भारतात पुढील वर्षी येणाऱ्या इलेक्ट्रिक कार 


भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी सध्या वाढत आहे त्यात बाईक्स तर आहेच पण कार देखील आहेत. इथे सर्व बघता सर्व कार कंपन्यांनी नवीन वर्षात उत्तम अशा इलेक्ट्रिक कार्स भारतात आणण्याचे ठरवले आहे. नवीन वर्षात आताच्या काही कारचे मॉडेल हे इलेक्ट्रिक देखील असेल किंवा काही नवीन कार मॉडेल देखील येतील.नवीन वर्षात इलेक्ट्रिक कार लाँच करणाऱ्या कंपन्यामध्ये मारुती सुझुकी, महिंद्रा, रेनॉल्ट, टाटा, जॅगुआर, ऑडी सोबत अमेरिकन कार कंपनी टेस्ला देखील असेल. नवीन वर्षाची सुरुवात होताच भारतात या इलेक्ट्रिक कार्स येतील.

1) मारुती वॅगनर इलेक्ट्रिक

मारुती सुझुकी कंपनीची लोकप्रिय हैचबॅक वॅगनर आता इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये लाँच केली जाणार आहे. ही कार जपान मध्ये विक्रीला असणाऱ्या इलेक्ट्रिक वॅगनरचे भारतीय व्हर्जन असेल. कंपनीने काही काळापूर्वी भारतात या गाडीच्या लाँचची घोषणा केली आहे.


मारुतीने सप्टेंबर 2018 मध्ये वॅगनर इलेक्ट्रिक चे 50 प्रोटोटाईप मॉडेलचे उत्पादन गुरुग्राम मधील प्लांटमध्ये टेस्टिंगसाठी घेतले गेले होते. या मॉडेल्सला आता भारतातील वातावरण आणि हवामानात टेस्ट केले जात आहे. 2021 मध्ये या मॉडेल्सची टेस्टिंग ही पूर्ण होईल आणि त्यानंतर ही इलेक्ट्रिक वॅगनर लाँच केली जाईल. वॅगनर इलेक्ट्रिकची किंमत ही 8 ते 9 लाख रुपये एक्स-शोरूम असू शकते.


2) महिंद्रा ई-केयूव्ही 100

2018 ऑटो एक्स्पो मध्ये महिंद्रा ई-केयूव्ही 100 बघितली गेली होती. तेव्हापासून ही गाडी भारतात कधी लाँच होईल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. महिंद्रा केयूव्ही 100 पेट्रोलच्या डिझाईनमध्ये थोडेसे बदल करून हे ई-केयूव्ही 100 मॉडेल लाँच केले जाऊ शकते. ही गाडी भारतात 9 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच होऊ शकते.


महिंद्रा ई-केयूव्ही 100 मध्ये 54 बीएचपी पॉवर आणि 120 न्यूटन मीटर टॉर्क प्रस्थापित करणारी मोटार दिलेली आहे. फुल चार्जिंग केल्यानंतर ही कार 147 किमी जाऊ शकते. म्हणले जाते आहे की भारतातील ही सर्वात फायदेशीर इलेक्ट्रिक कार असेल.


3) रेनॉल्ट क्विड इलेक्ट्रिक

रेनॉल्ट आता त्यांची लोकप्रिय हैचबॅक कार रेनॉल्ट क्विडच्या इलेक्ट्रिक व्हर्जनवर काम करत आहे. कंपनीने क्विडचे इलेक्ट्रिक व्हर्जन युरोपीय बाजारात उपलब्ध करून दिलेले आहे. कंपनीने ही कार डेसिया स्प्रिंग इलेक्ट्रिक या नावाने लाँच केले आहे. माहिती नुसार ही कार  सीएमएफ-ए प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. डेसिया स्प्रिंग इलेक्ट्रिक हीच कार भारतात रेनॉल्ट क्विड इलेक्ट्रिक या नावाने लाँच करेल.


या इलेक्ट्रिक कार मध्ये 33 किलोवॉटची इलेक्ट्रिक मोटार वापरलेली आहे. ही कार भारताच्या इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात कमी किंमतीची असू शकते. भारतात 2021 मध्ये या कारची बुकिंग सुरू होईल, ही कार 2 व्हेरियंट मध्ये उपलब्ध असेल.


4) टाटा अलट्रोज ईव्ही 

टाटा अलट्रोज ईव्ही या गाडीची झलक ऑटो एक्स्पो 2020 दिल्ली मध्ये दाखवली गेली. या कारला कंपनी ने अल्फा प्लॅटफॉर्म वर बनवले आहे आणि यात जीपट्रॉन टेक्निकचा वापर केलेला आहे. टाटा येणाऱ्या कार्स मध्ये देखील या टेकनिकचा वापर करेल. 


कंपनी ने या गाडीच्या विषयी जास्त काही समोर आणले नाहीये परंतु कारची बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 250 किमी इतकी चालू शकते. टाटा अलट्रोज ईव्ही याच वर्षी येणार होती परंतु करोना महामारीच्या मुळे हे लाँच पूढे ढकलले आहे. आता ही कार 2021 मध्ये लाँच होईल.


5) जॅगुआर आई-पेस

जॅगुआर आई-पेस इलेक्ट्रिक लवकरच लाँच होऊ शकते कारण याची बुकिंग भारतात सुरू केली गेली आहे. या कारची डिलिव्हरी मार्च 2021 मध्ये सुरू केली जाईल. जॅगुआर आई-पेस मध्ये दोन इलेक्ट्रिक मोटार लावलेली आहे जी 90kwh लिथियम आयन बॅटरी सोबत 400 बीएचपी पॉवर देऊ शकते. या बॅटरीवर कंपनी 8 वर्ष अथवा 1 लाख 60 हजार किमी ची वॉरंटी देते.


ही कंपनीची प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर 480 किमी जाऊ शकेल. कारमध्ये 4 व्हील ड्राइव्ह स्टॅंडर्ड मध्ये दिली जाईल. कंपनीने घरात आणि बाहेर ऑफिसमध्ये चार्जिंगसाठी टाटा पॉवरसोबत हातमिळवणी केली आहे.


6) ऑडी ई-ट्रॉन

ऑडी इंडिया भारतामध्ये पहिली लक्झरी एसयूव्ही आणणार आहे. कंपनीने ही कार 2021 मध्ये लाँच करण्याचे सांगितले आहे. ऑडी ई-ट्रॉनचा आकार ऑडी क्यू 5 आणि ऑडी क्यू 7 यांच्या सारखाच असेल. हिच्या डिझाईनला कंपनीने क्यू सिरीजचा लूक दिलाय. परंतु हिच्या बाकीच्या बऱ्याच युनिक डिझाईनमुळे हिला ऑडी सिरीजचा इतर गाड्यांपेक्षा वेगळा लूक येतो.


ऑडी ई-ट्रॉनची किंमत ही 54 लाख ते 56 लाखाच्या आसपास असेल. ऑडी ई-ट्रॉनमध्ये 2 इलेक्ट्रिक मोटार दिलेल्या आहेत, ज्या एकूण मिळून 355 बीएचपी ची पॉवर देऊ शकते. या इंजिनच्या पीक टॉर्क आऊटपूट हा 561 न्यूटन मीटर इतका आहे. ऑडी ई-ट्रॉन एकदा चार्ज केल्यावर 400 किमी रेंज देऊ शकते.


7) टेस्ला मॉडेल 3

 बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमेरिकन कार निर्माता कंपनी टेस्ला आपले उत्कृष्ट मॉडेल 3 ही कार भारतात आता लाँच करणार आहे. कंपनी पुढील वर्षी जानेवारी पासून भारतात या कारची बुकिंग सुरु करणार आहे. भारतात मॉडेल 3 ही टेस्लाची पहिली कार असणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार ही कार जून 2021 मध्ये लाँच केली जाईल. ही कंपनीची सगळ्यात स्वस्त कार असून सर्वात जास्त विकली जाणारी कार देखील आहे. ही कार भारतात पूर्णपणे बनवूनच येणार आहे, त्यामुळे कदाचित कंपनी दरवर्षी फक्त 2500 युनिटच घेऊन भारतात येईल.