Wider Tyres Pros and Cons ।। बाईक मध्ये मोठे आणि रुंद टायर बसवणे योग्य की अयोग्य

Wider Tyres Pros and Cons ।। बाईक मध्ये मोठे आणि रुंद टायर बसवणे योग्य की अयोग्य


आजच्या तरुण पिढीमध्ये बाईक मोडीफिकेशन (Bike Modification) चे क्रेज वाढतच चालले आहे. बाईकला अनेक प्रकारे मोडीफाय केले जात आहे ज्यामध्ये बाईकचे पार्टस आणि डिझाइन बदलली जाते. 

बाईकचे टायर बदलणे हे आता एक नॉर्मल मोडीफिकेशन झाले आहे. यामध्ये बाईकचे टायर बदलून तिथे रुंद आणि जाड टायर बसवले जातात. इथे आम्ही तुम्हाला याच मोडीफिकेशनचे फायदे काय आहे आणि तोटे काय आहेत हे समजून सांगणार आहोत.

या प्रकारचे मोडीफिकेशन हे बाईकच्या सीसी वर अवलंबून आहे.  जर तुमची बाईक ही 100 ते 125 सीसी इंजिनची असेल तर मोठे टायर बसवून गाडीला ग्रीप जास्त मिळेल परंतु गाडीचे मायलेज कमी झालेले असेल. रुंद आणि जाड मोठे टायर बसवल्याने गाडीचे वजन साहजिकच वाढेल, ज्यामुळे मायलेज कमीच मिळेल.

रुंद आणि मोठे जाड टायर बसवल्याने बाईकची रस्त्यावर पकड मजबूत होते कारण जास्त भाग हा रस्त्याच्या संपर्कात येतो. कमी पॉवर असलेल्या बाईक्स मधड जर मोठे आणि रुंद टायर बसवले तर इंजिनवर जास्त भार पडतो आणि गाडीची परफॉर्मन्स डाऊन होतो. 

आजच्या काळात 150 सीसी किंवा त्यापेक्षा जास्त पॉवर असलेल्या बाईक्स मध्ये आपल्याला हे टायर्स बघायला मिळतात. एक्सपर्ट्स च्या मतानुसार बाईकमध्ये बसवलेले कंपनीचे आणि मुख्य टायर्स सोबतच बाईक आपला खास परफॉर्मन्स दाखवू शकते. रुंद आणि मोठे टायर्स बसवल्याने बाईकच्या इंजिनवरील भार हा खूप वाढतो ज्याचा परिणाम बाईकच्या परफॉर्मन्सवर होतो.

असे ठरवा योग्य टायर

टायर दोन प्रकारचे असतात, पहिले ट्यूब टायर आणि दुसरे ट्युबलेस टायर! किंमतीच्या मानाने ट्युबलेस टायर हे साधारण टायरपेक्षा 400 ते 500 रुपये अधिक किंमतीचे असतात परंतु या ट्युबलेस टायर मुळे रोडवर योग्य ग्रीप मिळते. जरी टायर पंक्चर झाले तरी ट्युबलेस टायर मध्ये बराच वेळ हवा शिल्लक राहते, ज्यामुळे आपल्याला गाडी सहज कंट्रोलमध्ये आणता येते.

बाईकचे टायर बदलत असाल तर लक्षात ठेवा जुन्या टायरच्या मापाचेच दुसरे टायर तिथे बसवा. जर बाईकमध्ये अगोदरच मोठे टायर असतील तर तसेच बसवा आणि छोटे असतील तर तेच बसवा.

आजकाल बाजारात ब्रँडेड कंपनीच्या नावांचे वापर करून डुप्लिकेट टायर्स देखिल आहेत. त्यामुळे टायर खरेदी करताना त्याची तपासणी करूनच विकत घ्या. आपण टायरची बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग तारीख आणि दर्जा तपासून बघा. टायरवर कंपनीचे होलोग्राम लावलेले असते ते नक्की बघून घ्या आणि हो टायरची वॉरंटी आणि बिल घ्यायला विसरू नका.