Car Tips ।। हे 5 संकेत दिसत असतील तर आपली कार आजच सर्व्हिसिंग करून घ्या

Car Tips ।। हे 5 संकेत दिसत असतील तर आपली कार आजच सर्व्हिसिंग करून घ्या


तुम्ही कार वापरत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की कार ची जुनी परफॉर्मन्स आणि मायलेज टिकवून ठेवायचं असेल तर तिला वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. जेव्हा आपण नवीन कार घेतो तेव्हा आपल्याला मेंटेनन्स शेड्युल दिलेले असते त्यानुसार आपल्याला आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. परंतु कार जुनी झाल्यावर किंवा जुनी कार खरेदी केल्यावर आपल्याला असे काही वेळापत्रक मिळत नाही परंतु तरी देखील आपल्याला वेळोवेळी गाडीच्या वापरानुसार सर्व्हिसिंग ही करावी लागते.

काही एक्सपर्ट नुसार कार ला 6 महिन्यांनी, 1 वर्षाने किंवा 10000 किमी मध्ये एकदा सर्व्हिसिंग केले पाहिजे. हे महत्वाचे असले तरी देखील यावरून मधल्या काळात तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम येणार नाही असे गृहित धरू नये.

अशाच काळासाठी काही समस्या आम्ही घेऊन आलो आहे ज्या दिसत असतील तर आपल्याला आपल्या वाहनाची लवकरात लवकर सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. म्हणजेच जर हे प्रॉब्लेम दिसत असतील तर लवकरात लवकर सर्व्हिस करायला गाडीला घेऊन जावे.

1. इंजिन वॉर्निंग लाईट


जर तुमच्या कारमध्ये इंजिन लाईट दिसत असेल तर समजून जायचे की तुमच्या कारच्या इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. काहीही छोटासा प्रॉब्लेम जरी असेल तरी आपल्या इंजिनचे चेक उप सर्व्हिस सेंटर ला जाऊन केले पाहिजे. हा प्रॉब्लेम गाडी लगेच बंद पडेल असा नसू शकेल परंतु जर गाडी बंद पडली तर टोचन व्हॅन शिवाय दुसरा काही पर्याय नसेल.

2. ब्रेकिंग मध्ये समस्या


वाहनात ब्रेकिंग किती महत्वाची असते हे तुम्हाला सांगायला नको. हे कार सोबत तुमच्या आयुष्याच्या सुरक्षेसाठी देखील गरजेचे आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काही काळानंतर ब्रेक पैड निघून जायला लागतात, ज्यामुळे ब्रेकिंग सिस्टम अडकत असेल किंवा लागत नसेल तर ती लगेच दाखवून घेतली पाहिजे.

3. पॉवर ची कमतरता


जर तुम्हाला ड्रायव्हिंग करताना कार ची पावर कमी आहे असे जाणवत असेल तर कमी इंजिन कम्प्रेशन किंवा जाम फ्युअल फिल्टर असे काही कारण असू शकतात. काहीही झाले तरी कारच्या पॉवरमध्ये कमतरता कारच्या फंक्शनिंग मध्ये किंवा सेफ्टी मध्ये अडथळा आणू शकते. त्यामुळे अशा समस्येकडे दुर्लक्ष न करता ती मॅकेनिक कडे जाऊन दुरुस्त करून घ्यावी.

4. कार मध्ये लिकेज


बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या गाडीच्या खाली इंजिन ऑइल, फ्युअल किंवा कुलंट सारख्या गोष्टी गळताना दिसतात. या सर्व बाबी कार साठी सर्वात धोकादायक ठरू शकतात, जर कार सुरू होत नसेल तर टोचन करून आणि सुरू होत असेल तर लगेच मॅकेनिक कडे घेऊन जावे.

5. वेगळा आवाज येणे


जर कार सुरू करताना किंवा कार चालू असताना काही वेगळा आवाज आल्यास त्याची तपासणी करावी. बऱ्याच वेळा हे नॉर्मल काही कारण असू शकते पण तुम्ही काळजी घेतल्याने मोठ्या धोक्यापासून तुम्ही अगोदरच सतर्क झालेला असाल.