2021 मध्ये येणाऱ्या टॉप 20 कार ।। Top 20 Upcoming Cars in 2021

2021 मध्ये येणाऱ्या टॉप 20 कार ।। Top 20 Upcoming Cars in 2021



2020 मध्ये कार विश्वात बरेचसे बदल झाले परंतु 2021 हे वर्ष 2020 पेक्षा खूप जास्त अनोखे असणार आहे. भारतात बऱ्याच नवीन कंपनी आपल्या कार घेऊन 2020 मध्येच आल्यात परंतु 2021 मध्ये आत्मनिर्भर भारत मध्ये या कंपनी भारतात आपला व्यवसाय रुजवायला बघू शकतात.


आज आपण 2021 मध्ये येणाऱ्या कार विषयी जाणून घेऊयात. आपण या 21 गाड्या मॅन्युफॅक्चरिंग नुसार जाणून घेऊयात!


महिंद्रा

महिंद्रा ने आपल्या 2020 वर्षात Thar 2020 ने धुमाकूळ घातला होता आणि त्यांच्याकडून येणाऱ्या काही कार 2020 मध्ये न येता त्या 2020 मध्ये येणार आहेत.


१) Mahindra XUV 500


महिंद्रा कडून ही न्यू जनरेशन गाडी असेल आणि प्लॅटफॉर्म, फीचर्स आणि डिजाईन च्या बाबतीत ही कार पूर्णपणे नवी असेल. गाडी चे काही फीचर्स समोर येताय त्यात कदाचित सेमी- ऑटोनोमस फिचर असू शकते. 

मार्च ते एप्रिल 2021 मध्ये ही गाडी मार्केट मध्ये येईल. 

या गाडी मध्ये तुम्हाला 2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 2.2 लिटर डिझेल इंजिन मिळेल. थार मध्ये मिळणारेच इंजिन तुम्हाला इथे कदाचित आणखी जास्त पावर सोबत मिळतील. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मॉडेल मध्ये ऑटोमॅटिक देखील ऑपशन मिळू शकेल.

किंमत ही 18 ते 25 लाखाच्या आसपास असू शकते.


२) Mahindra The Scorpio


महिंद्रा आपल्या या नवीन कार ने या सेगमेंटच्या पूर्ण व्याख्या बदलू शकतात. ऑटो एक्स्पो मध्ये सर्व जण स्कॉर्पिओ साठी विचारणा करत होते आणि महिंद्रा ने या सर्वांची मागणी पूर्ण करण्याचे ठरवले आहे. महिंद्रा ने शेवटच्या चर्चेत सांगितले होते की ही गाडी ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच केली जाईल. कदाचित महिंद्रा चा फाउंडर दिवस म्हणजेच 2 ऑक्टोबर ला ही गाडी लाँच केली जाऊ शकते.

2 लिटर पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल इंजिन सोबत ही गाडी डिजाईन आणि परफॉर्मन्स मध्ये खूप बदल घेऊन येत आहे. XUV 500 इतकी पावर यात नसेल परंतु पावर रेटिंग  सारखीच असेल. पेट्रोल आणि डिझेल मध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही मोड्स दिले जातील.

स्कॉर्पिओ ची किंमत ही 12 ते 20 लाख या दरम्यान असेल.


३) Mahindra eKUV 100


2018 आणि 2020 ऑटो शो मध्ये दाखवली गेलेली ही कार फायनली लाँच होणार आहे. महिंद्रा याअगोदर ही कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये घेऊन आले होते नंतर डिझेल बंद करण्यात आले आणि आता इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे. ही गाडी परफेक्ट सिटी कार असू शकते आणि हीची किंमत ही 10 लाखाच्या आत असेल. 120 ते 150 किमी बॅटरी रेंज या गाडीची असू शकेल. 


महिंद्रा कदाचित eXUV 300 देखील घेऊन येऊ शकते. हिच्यात 400 किमी ची रेंज मिळू शकते असे महिंद्रा क्लेम करते. ऑटो एक्स्पो मध्ये ही कार दाखवली गेली होती आणि हिची किंमत 20 लाखाच्या आसपास असू शकेल. ही लाँच होईल की नाही याची जास्त माहिती नसल्याने हिच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाहीये.


Tata Motors


४) Tata Gravitas


टाटा हॅरीयार चे 7 सीटर व्हर्जन म्हणजे टाटा ग्रॅविटास ही गाडी असणार आहे. या गाडीचे डिझाइन हे खरच नेक्स्ट लेव्हल आहे. हॅरीयार पेक्षा डिझाइन वेगळी आहे आणि गाडी तशी मोठी आहे, रियर डिस्क ब्रेक, थर्ड रो सिटिंग देखिल आहेत. या गाडीत हॅरीयार पेक्षा अन्य वेगळे फीचर्स दिले जातील ज्यात इलेक्ट्रॉनिक स्टीयरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक दिले जातील आणि इतरही बरेच फीचर्स यात असतील. सध्या तरी डिझेल इंजिन या गाडीत असेल परंतु पुढे जाऊन पेट्रोल इंजिन देखील या गाडीत दिले जाइल. 2 लिटर डिझेल इंजिन जे हॅरीयार मध्ये आहे तेच तुम्हाला इथे देखील मिळेल. 19 ते 27 लाख रुपये इतकी ऑन रॉड किंमत या गाडीची असू शकते. 


५) Tata HBX


6 ते 10 लाख किंमत या गाडीची असू शकते आणि ही गाडी वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाईल. टाटा अलट्रोज प्रमाणे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन या गाडीमध्ये तुम्हाला मिळेल. पुढे जाऊन 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील या गाडीमध्ये बघायला मिळेल. 

याशिवाय अलट्रोज चे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन देखील येणार आहे. ALtroz ev किंमत ही 9 ते 14 लाख असू शकते. 

जून किंवा जुलै 2021 मध्ये ही कार येऊ शकते.


आता अशा दोन कंपनी विषयी बोलणार आहोत ज्या भारतात आपल्या 2 नवीन कार घेऊन येणार ज्यातील एक ही सेडॅन आणि SUV घेऊन येतेय. 


Volkswagen


६) Volkswagen Taigun


ही कार जून जुलै च्या काळात लाँच केली जाऊ शकते. 18 ते 22 लाखाच्या आसपास हिची किंमत असू शकते.  


७) Volkswagen New Generation Vento


व्हॉलक्सवॅगन कडून न्यू जनरेशन वेंटो ही कार मार्च 2021 च्या आसपास येऊ शकते. पेट्रोल इंजिन मध्ये ही कार लाँच केली जाईल आणि डिझेल इंजिन मध्ये ही नसेल. सेफटी जास्त असेल आणि ड्रायव्हिंग एक्सपेरीयन्स देखील उत्तम करण्याचा प्रयत्न केला असेल. 

गाडी मार्च एप्रिल मध्ये लाँच केली जाईल


Skoda


८) Skoda Rapid


स्कॉडा रॅपिड देखील नवीन व्हर्जन मध्ये येईल. ही गाडी कोणी बघितली नाहीये परंतु युरोपियन मार्केट सारखी डिझाइन या गाडीत असू शकेल. परंतु पूर्णपणे भारतात बनणार असल्याने कदाचित भारतीय डिझाइन तिथे मिळेल आणि किंमत देखिल खूप अग्रेसिव्ह असेल. स्कॉडा रॅपिड ही 9 ते 14 लाख या किंमतीत लाँच केली जाईल. 

जून जुलै मध्ये ही स्कॉडा रॅपिड आपल्या भेटीला येईल.


९) Skoda Vision IN


ऑटो एक्स्पो मध्ये दिसल्याप्रमाणे या गाडीची 80 ते 90% डिजाईन ही सेम असेल. मार्च एप्रिल मध्ये ही गाडी लाँच होऊ शकते. गाडीची किंमत ही 18 ते 22 लाख असू शकते. सुरुवातीला यात फक्त पेट्रोल इंजिन दिले जाईल आणि कदाचित पुढे जाऊन डिझेल इंजिन देखील देऊ शकतात. 


Maruti


१०) Maruti Celerio


नवीन सेलेरिओ ही कार हार्डटेक प्लॅटफॉर्म वर बनवलेली असेल. इस्प्रेसो आणि वॅगनार वाल्या प्लॅटफॉर्म वर ही कार असेल. 1 लिटर आणि 1.2 लिटर चे पेट्रोल इंजिन या गाडीत आपल्याला बघायला मिळतील. याशिवाय 1 लिटर मध्ये CNG ऑपशन देखील मिळेल. 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT दोन्हीही मिळेल, CNG सोडता.

मार्च एप्रिल च्या आसपास या गाडीचा लाँच होईल आणि हिची किंमत ही 5 ते 8 लाख या गाडीची किंमत असेल.


१२) Maruti XL5


मारुती आता त्यांच्या वॅगनार चे पुढचे व्हर्जन म्हणजे जसे एर्टीगा चे XL6 होते तसे वॅगनार चे XL5 हे असेल. XL 6 ही नेक्सा च्या अंतर्गत विकली जाईल, थोडी जास्त स्टायलिश असेल ही कार! वॅगनार पेक्षा 50 हजार जास्त किंमत या गाडीची असेल. तर ही गाडी ज्यांना वॅगनार ही अगदी कॉमन गाडी वाटते त्यांना एक चांगली संधी देईल.


१३) Maruti Wagnor Electric


मारुती ने या गाडीची जास्तीत जास्त टेस्टिंग करून आता ही कार पूर्णपणे रेडी करून लाँच करायचा निर्णय घेतला आहे. जून जुलै 2021 मध्ये या गाडीचा लाँच आयोजित केला जाईल. जुन्या वॅगनार च्या शेप मध्ये ही गाडी न येता नवीन वॅगनारच्या शेप मध्ये ही कार येईल.

150 ते 200 किमी ही रेंज या गाडीची असेल व किंमत ही 10 लाखाच्या आसपास असेल.


Hyundai


१४) Hyundai Creta 7 Seater


ही क्रेटा ची मोठी बहीण असेल कारण ही 7 सीटर असेल. 7 सीटर मार्केट मध्ये सध्या दम नाहीये कारण SUV जुन्या झाल्यात आणि इनोव्हा यात येत नाही. त्यामुळे क्रेटा आणि ग्राव्हिटास मुळे या मार्केट मध्ये जिवंतपणा येईल. जून जुलै 2021 च्या आसपास ही गाडी मार्केटमध्ये येईल. सध्याच्या क्रेटा पेक्षा 1.5 ते 2 लाख रुपये जास्त किंमत असेल या गाडीची! सेलटॉस सारखे फीचर्स जे सध्याच्या क्रेटा मध्ये नाहीयेत ते कदाचित नवीन 7 सीटर क्रेटा मध्ये दिले जाऊ शकतात.


१५) Hyundai AX ( Little Venue)


Hyundai आपली सुपर कॉम्पॅक्ट साईज SUV घेऊन येत आहे जी Venue पेक्षा छोटी असेल. हिच्यात 1.2 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. 6 ते 10 लाख ही या कार ची किंमत असेल आणि दिवाळीच्या अगोदर ही गाडी बाजारात उपलब्ध असेल. 


Renault


१६) Renault Kieger


मार्च मध्ये ही गाडी भारतात दाखल होईल आणि ही जवळपास magnite च छोटं व्हर्जन असेल. Triber, Kieger आणि magnite या तिन्ही गाड्यांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात सारखेपणा असणार आहे. इंजिन, किंमत, स्पेसिफिकेशन आणि खूप काही सारखे असणार आहे. 


कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट मध्ये काही हालचाल व्हायला पाहिजे. बऱ्याचश्या अपडेट या वर्षी आल्यात आणि त्यामुळे 2021 देखील यासाठी धमाकेदार असणार आहे.


MG


१७) MG ZS


ZS अगोदरच आहे असे तुम्ही म्हणाल परंतु सांगू इच्छितो की हिचे पेट्रोल व्हर्जन भारतीय बाजारात आता उपलब्ध होणार आहे. ZS eV हे व्हर्जन महागडं आहे परंतु पेट्रोल व्हर्जन आवक्यात आहे. साईज आणि प्राईज नुसार nexon आणि क्रेटा च्या अगदी मधोमध ही गाडी असेल. S-cross च्या किमती मध्ये ही गाडी मार्केट मध्ये असेल जी मिड लेव्हल प्राईज मध्ये टॉप लेव्हल फीचर्स देईल. जून जुलै 2021 मध्ये गाडी बाजारात उपलब्ध असेल.


१८) Ford XUV 500


फोर्ड आणि महिंद्रा सोबत मिळून काम करत आहेत. दोन्ही कंपन्यांच्या गाड्या या आता सारख्याच प्लॅटफॉर्म आणि इंजिन वर बनतील फक्त टेस्टिंग जे ते ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या करतील. ही ह्युंडाई किया, व्हॉलक्सवॅगन स्कोडा सारखी गोष्ट आहे. 2 लिटर पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल इंजिन मिळेल. फोर्ड ची किंमत ही महिंद्रा पेक्षा जास्त असेल.


१९) skoda Octavia


आपल्या लिस्ट मधील ही एकमेव बेस्ट सेडॅन आहे. 2021 च्या end ला ही कार लाँच केली जाईल. 24 ते 33 लाख इतकी किंमत या कारची असेल.  यात हायब्रीड आणि पेट्रोल हायब्रीड देखील उपलब्ध होतील. या कार मध्ये आणखी फीचर्स ऍड करण्याचा प्रयत्न केला जाइल.


२०) Jeep Compass 7 Seater SUV

फॉर्च्युणार सेगमेंट मध्ये ही कार असेल पण परंतु तिच्या सारखी जुनी डिझाइन हिची नसेल. होंडा CRV सारखी काहीशी डिझाइन या कार ची असेल. डिझेल इंजिन या गाडीत उपलब्ध असेल. जून जुलै 2021 मध्ये ही कार लाँच केली जाईल आणि हिची किंमत 30 ते 37 लाख असेल.