Honda Hornet 2.0 Review ।। होंडा हॉरनेट 2.0 रिव्ह्यू

Honda Hornet 2.0 Review ।। होंडा हॉरनेट 2.0 रिव्ह्यू 


होंडा ने पहिल्या जनरेशन ची हॉरनेट 160 भारतात 2015 साली आणल्यानंतर ती लोकांना खूप जास्त आवडली व या बाईकची विक्री देखील खूप चांगल्या प्रकारे झाली. फर्स्ट जनरेशन होंडा हॉरनेट दिसायला खूप स्टायलिश आणि दमदार होती, ज्यामुळे युवा वर्गात ही बाईक खूप पसंद केली गेली.

आता होंडा ने सेकंड जनरेशन हॉरनेट 2.0 लाँच केली आहे. या बाईकची किंमत ही 1.27 लाख इतकी असेल. बघायला गेलं तर तशी हिची किंमत वाढली आहे परंतु यात खूप सारे बदल देखील केले आहेत. हॉरनेट 2.0 पहिल्यापेक्षा जास्त स्पोर्टी लूक मध्ये आलेली आहे आणि त्यासोबत यात मोठे इंजिन देखील दिलेले आहे.

डिजाईन आणि स्टाईल


पहिल्या नजरेत हॉरनेट 2.0 दिसायला आकर्षक वाटते आणि आपले लक्ष वेधून घेते. मॅट ब्ल्यू कलर ची हॉरनेट दिसायला उत्तमच आहे. बाईक मध्ये समोरच्या बाजूला असलेली सोनेरी रंगाची अपसाईड डाऊन फोर्क आपले लक्ष वेधून घेते. ही फोर्क शोवा या कंपनी कडून घेण्यात आलेली आहे. वरच्या भागात हेडलाईट मध्ये फुल एलईडी हेडलाईट आणि एलईडी डीआरएल दिलेले आहेत. हे हेडलाईट खूप चांगल्याप्रकारे ब्राईट आहेत आणि यांच्या मदतीने रात्री देखील आपण गाडी चालवताना समस्या येणार नाही. 

हेडलाईटच्या वर नेगेटिव एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेले आहे. या क्लस्टर मध्ये ब्राईटनेस चे 5 मोड दिलेले आहेत परंतु कधी कधी जास्त ऊन असेल तर ते दिसत नाहीत.

इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये स्पिडोमीटर , टैकोमिटर, गियर पोजिशनिंग इंडिकेटर, बॅटरी व्होल्टेज, ट्रिप, टाईम दिलेले आहेत. सोबत चेक इंजिन, एबीएस, हाय बीम व टर्न सिग्नल इंडिकेटर देखील दिलेले आहेत. टर्न विषयी बोलू तर हॉरनेट 2.0 मध्ये एलईडी इंडिकेटर दिलेले आहेत.

हॉरनेट 2.0 मध्ये स्विचगियर दिलेले आहेत त्यांची क्वालिटी अजून चांगली होऊ शकत होती. स्विचगियर इतके देखील बेकार नाहीयेत. हॉरनेट मध्ये आम्हाला आवडलेली गोष्ट म्हणजे हिचे बटन रायडर सहज हाताळू शकतो कारण ते योग्य ठिकाणी दिलेले आहेत. या बाईक मध्ये हैंडलबारच्या डाव्या बाजूला हजार्ड लाईट इंडिकेटर स्विच दिलेले आहे.

हॉरनेट 2.0 मध्ये स्पोर्टी टॅंक आणि त्यासोबत एक्सटेंडर दिलेले आहेत. हा टॅंक दिसायला मोठा असला तरी फ्युअल कॅपॅसिटी 12 लिटर इतकी आहे. 12 लिटर पुरेसा आहे परंतु साईज नुसार आणखी वाढू शकत होती. टॅंक वर HORNET चा बॅच तर एक्सटेंडर वर होंडा ची ब्रँडिंग बघायला मिळते. जिथे 2.0 चे स्टिकर आलेले आहे तिथे सेंट्रल पॅनलची फिनिशिंग आणि फिट क्वालिटी थोडीशी कमी असलेली आहे.

हॉरनेट मध्ये आपल्याला स्प्लिट सीट सेटअप दिलेला आहे. रायडरची सीट थोडीशी खाली आहे आणि ही कम्फर्टेबल देखील आहे. पिलीयन सीट देखील लांब आणि रुंद आहे, त्यामुळे लांबच्या प्रवासात जास्त प्रॉब्लेम येणार नाहीत. बाईक ची ग्रॅब रेल हिला आकर्षक लूक देते आणि पिलीयन साठी सपोर्ट च काम देखील करते.

हॉरनेट 2.0 मध्ये एलईडी ब्रेक लाईट दिलेले आहेत. ब्रेक लाईट मध्ये आकर्षक अशी एक्स आकाराची डिजाईन दिलेली आहे. हॉरनेट 2.0 पूर्णपणे आकर्षक भासते, फक्त हॉरनेट बॅच सोडता. नवीन हॉरनेट 2.0 मध्ये जुन्या मॉडेल मधले काहीच कॅरी फॉरवर्ड केलेले नाही.

इंजिन आणि हँडलिंग


हॉरनेट 2.0 मध्ये नवीन 184.55 सीसी चे एयर कुल्ड सिंगल इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 17 बीएचपी ची पॉवर आणि कमीत कमी 1611 न्यूटन मीटर चा टॉर्क देते. या बाईक मध्ये 5 स्पीड गियरबॉक्स  दिलेला आहे. गियरबॉक्स खूप हलका दिलेला आहे, गियरिंग देखील शॉर्ट ठेवलेली आहे ज्यामुळे गाडी उभी असताना देखील दुसऱ्या गियर वर गाडी निघू शकेल व बंद पडणार नाही. क्लच देखील खूप हलका आहे ज्यामुळे स्टॉप अँड गो ट्राफिक मध्ये ही बाईक हाताला जास्त स्ट्रेस देत नाही. बाईकची रायडिंग पोजिशन ही आरामदायक आहेच, फूटपॅड ला थोडं स पुढे ठेवले आहे आणि हँडलबार देखील समोर आले आहे. हे रायडिंग कॉम्बिनेशन उंच आणि मोठ्या रायडरला एक चांगला रायडिंग स्टान्स देते. रायडिंग स्टान्स हा अग्रेसिव्ह नसल्याने लांबच्या प्रवासात देखील रायडरची पाठ दुखणार नाही.

हॉरनेट 2.0 मध्ये समोर 110 मिमी सेक्शन आणि पाठीमागे 140 मिमी सेक्शनचे टायर लावलेले आहेत. बाईक मध्ये समोर यूएसडी फोर्क लावलेले आहेत, ज्यामुळे जुन्या मॉडेल पेक्षा या मॉडेलचा सस्पेंशन सेटअप थोडा कडक आहे. याच गाडीमध्ये पाठीमागे मोनो शॉक दिलेले आहेत.

शहरात ड्रायव्हिंग करत असाल किंवा खराब रस्त्यांवर, दोन्ही ठिकाणी राईड क्वालिटी एकदम मस्त आहे. रस्त्याच्या किनाऱ्यावर गाडी चालवत असाल तर ही गाडी तिच्या उत्तम सस्पेनशन मुळे सहज हँडल करता येते. गियर शॉर्ट रेशो असल्याने हॉरनेट 2.0 तुम्हाला चांगल्या प्रकारे पिकअप देते.ही मोटरबाईक तुम्हाला 9700 आरपीएम पर्यंत रेव देते. जास्त गियर आणि कमी स्पीड वर देखील ही बाईक स्ट्रेसड आऊट वाटत नाही. या बाईकला 90 ते 95 किमी/तास वेगावर देखील सहजपणे क्रुज केले जाऊ शकते.

कमी स्पीड वर व्हायब्रेशन जाणवत नाहीत परंतु गाडी जेव्हा 100+किमी प्रति तासाच्या वेगावर असते तेव्हा फुटरेस्ट वर व्हायब्रेशन्स जाणवायला लागतात. या बाईकमध्ये तुम्ही 120 किमी/तास इतकी स्पीड सहज प्राप्त करू शकता. ब्रेकिंग साठी समोर आणि पाठीमागे देखील सिंगल पेटल डिस्क दिलेले आहेत. या बाईक मध्ये तुम्हाला सिंगल चॅनल एबीएस दिलेला आहे, जो चांगल्या प्रकारे काम करतो.


मायलेज ची गोष्ट येते तेव्हा हॉरनेट 2.0 शहरात 34-37 किमी इतकं एव्हरेज देते तर हायवे वर 39 ते 345 किमी/ लिटर एव्हरेज देते.  या हिशोबाने ही गाडी फ्युअल टॅंक सोबत 480-500 किमी जाऊ शकते.