चालू गाडीच्या बोनट वर चढून घेतली सेल्फी, पोलिसांनी 7,500 रुपये लावला दंड
चालू गाडीच्या बोनट वर चढून घेतली सेल्फी, पोलिसांनी 7,500 रुपये लावला दंड
देशात कडक वाहतूक नियमावली असताना देखील खूप लोक ट्राफिक रल्स तोडताना आपल्याला बघायला मिळतात. अशातच युवा पिढीच्या मध्ये चालू कार आणि बाईकवर स्टंट करत सेल्फी आणि व्हिडीओ बनवण्याचे प्रकार समोर येत आहे. सध्याच्या काळात उत्तर प्रदेश मधील फिरोजाबाद मधील काही मुलांचा चालू गाडीच्या बोनेटवर बसून सेल्फी घेण्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच फिरोजाबाद पोलिसांनी कार मालकावर कारवाई करत 7500 रुपयांचे चलन फाडले. पोलिसांनी कारच्या बोनेटवर बसून सेल्फी घेणाऱ्या त्या दोन युवकांवर देखील मोटार वाहन नियम आणि आईपीसी कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना फिरोजाबाद जिल्हा मुख्यालयातील आहे. पोलिसांच्या अनुसार त्यांनी कार बोनेटवर सेल्फी घेणाऱ्या मुलांची आणि कार चालकाची माहिती मिळवली आहे. सर्व मुलांचे वय हे 20 वर्षाच्या आसपास आहे.
आता काही काळापूर्वीच फिरोजाबाद येथील युवकावर चालू कारच्या छतावर चढून पुशअप्स काढण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच्यावर दंडाची रक्कम आणि गुन्हा देखील नोंदवला गेला होता. ही व्हिडीओ त्या मुलाने मोबाईलवर शूट करून इंटरनेट वर शेअर केली होती. त्यानंतर व्हिडीओ इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल झाली होती.
या खतरनाक स्टंट चा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी याकडे लक्ष देऊन गुन्ह्यात शामिल असलेल्या मुलावर 2500 रुपये दंड आकारला होता.
पोलिसांनी सांगितले की अशा घटना थांबवण्यासाठी कारवाई केली जाते आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने अन्य लोकांना असे प्रताप करण्याची प्रेरणा मिळते आहे. याचे परिणाम खूप वाईट देखील होऊ शकता.
रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय च्या एका रिपोर्ट नुसार देशात रस्ते दुर्घटना मधील मुख्य कारण हे जास्त वेगाने गाडी चालवणे हे आहे. यात रस्त्याने स्टंट करणे आणि अनियंत्रित वेगात गाडी चालवणे हे समाविष्ट आहे.
टिप्पणी पोस्ट करा