India's First Driverless Train ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पहिल्या ड्रायव्हरलेस ट्रेनचे केले उदघाटन

India's First Driverless Train ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पहिल्या ड्रायव्हरलेस ट्रेनचे केले उदघाटन


सोमवारी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या ड्रायव्हरलेस ट्रेनचे उदघाटन केले. ही ट्रेन दिल्ली मेट्रोची ट्रेन असुज ती मॅजेंटा लाईनवर चालवली जाईल. यासोबत एयरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डाची सुरुवात करण्यात आली आहे. ही ड्रायव्हरलेस ट्रेन पूर्णपणे ऑटोमॅटिक असेल.

ही ड्रायव्हरविरहित ट्रेन माणसांच्या चुकांना पूर्णपणे टाळून आपले कार्य करेल. सध्या ही ट्रेन मॅजेंटा लाईनवर सुरू केली असून ती आता कदाचित पुढील वर्षी पिंक लाईनवर सुरू केली जाऊ शकते. या प्रसंगी प्रधानमंत्री बोलले की ही टेकनिक आपला प्रवास अधिक सुखकर करण्यास मदत करेल.

मॅजेंटा लाईन ही दिल्लीतील जनकपुरी वेस्टला बोटॅनिकल गाईड लाईनला जोडते. या ट्रेनची ट्रायल ही पिंक लाईनच्या 20 किमी अंतरात सप्टेंबर 2017 मध्ये सुरू केली गेली होती, 2022 पर्यंत ही ट्रेन दिल्लीच्या सर्व ट्रेन नेटवर्क साठी उपलब्ध करून दिली जाईल.

या ट्रेनला पूर्णपणे दिल्ली मेट्रोच्या 3 कमांड सेंटर वरून ऑपरेट केले जाईल, यामध्ये कुठल्याही प्रकारे मनुष्य मदत घेतली जाणार नाही. या ट्रेनमध्ये कम्युनिकेशन आधारित ट्रेन सिग्नल कंट्रोल टेकनिक वापरलेली आहे, जी ट्रेन ऑपरेशन दरम्यान येणाऱ्या समस्यांना सोडवण्यात काम करेल.

ह्युमन पॉवरची गरज ही फक्त हार्डवेअर रिप्लेसमेंट मध्ये होणार आहे.  कमांड सेंटर वरून पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टमला इन्फॉर्मेशन कंट्रोलर हँडल करणार आहेत, यासोबत क्राऊड मॉनिटरिंग केली जाणार आहे.  सीसीटीव्हीच्या मदतीने रियल टाईम ट्रेन उपकरणांची पाहणी केली जाईल. 

ही ऑटोमॅटिक ट्रेन फक्त लाईन 7 आणि लाईन 8 पुरती मर्यादित आहे. पुढे येणाऱ्या काळात याला संपूर्ण रेल्वे नेटवर्क मध्ये प्रस्थापित केले जाणार आहे. 

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डविषयी सांगायचे झाले तर हे कार्ड मागच्या वर्षी मार्चमध्ये आणले गेले. या कार्डने आपण मेट्रो, टोल टॅक्स, ट्रेन तिकीट , पार्किंग चार्ज आणि बस भाडे देखील भरू शकता.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड रूपे स्कीमच्या अंतर्गत लाँच केलेले आहे. रूपे हे भारतीय कार्ड असून याचा उदेश्श मास्टरकार्ड आणि व्हिसाकार्ड या परदेशी कार्डांचा वापर कमी करणे असेल.

हे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड सारखे आहे ,परंतु याचा ट्रांजेक्शन खर्च हा कमी आहे, याचा वापर करून तुम्ही तुमचा खर्च कमी करू शकता. भारतीय स्टेट बँक सोबत इतर 25 बँक हे कार्ड आपल्याला देतात. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डाचा वापर करून तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा पैसे देखील काढू शकता. हे कार्ड संपूर्ण भारत भरात लागू आहे.