Nissan Note Launched ।। निसानची ऑल व्हील ड्राइव्ह नोट मॉडेल झाले लाँच

Nissan Note Launched ।। निसानची ऑल व्हील ड्राइव्ह नोट मॉडेल झाले लाँच


निसानने नोट या कॉम्पॅक्ट कारचे अनावरण केले आहे. आत्ताच्या या मॉडेल मध्ये ऑल व्हील ड्राइव्ह हे ऑपशन दिलेले आहे. मागील महिन्यात आलेल्या मॉडेलमध्ये टू व्हील ड्राइव्ह ऑपशन बघायला मिळत होते. निसान न मध्ये हायब्रीड ई पॉवर टेकनिक सोबत दोन इलेक्ट्रिक मोटार लावलेल्या आहेत ज्या ड्रायव्हरच्या कंट्रोल आणि एक्सीलेटरच्या अनुभवला वेगळ्या उंचीवर पोहोचवते.

निसान नोट ऑल व्हील ड्राइव्ह ची विक्री ही 2021 च्या सुरवातीपासून होऊ शकते. निसान नोट एडब्ल्यूडी च्या मोटर या समोर आणि पाठीमागे लावलेल्या आहेत, ज्या दोन्ही व्हीलला वेग देतात. रियर मोटर मध्ये मोठ्या आउटपुट मुळे उत्तम अशी स्टँडिंग स्टार्ट तुम्हाला या गाडीत बघायला मिळेल.

यासोबत अनेक प्रकारच्या ड्रायव्हिंग कंडिशन जसे बर्फ किंवा चिखलाचे रस्ते यांच्यावर योग्य मिड स्पीड एक्सलरेशन मिळवून देईल. यासोबतच कारची ऑल व्हील ड्रायव्हिंग कॉर्नरिंग, स्थिर आणि स्मूथ डीसलरेशन मिळू शकते. सर्व व्हीलवर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लावलेली आहे.

टू व्हील ड्राइव्ह मोड प्रमाणेच ऑल व्हील ड्राइव्ह मध्ये ई- पॉवर हायब्रीड टेकनिक,वाहनाला पॉवर देण्यासाठी पेट्रोल इंजिनचा वापर बॅटरी चार्ज करण्यासाठी केला आहे.

नवीन ऑटोनोमस ड्राइव्ह सिस्टम घाटाच्या रस्त्यात ड्रायव्हिंगला जास्त सुलभ करते.

जपानमध्ये निसान नोट रेनॉल्टच्या प्लॅटफॉर्मचा वापर करते,  हीच गाडी टोयोटा यारीस आणि होंडा फिटला जपानी बाजारात टक्कर देते. कंपनीने 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत, आता डॅटसन आणि निसानच्या गाड्या आता 5% जास्त किंमतीत खरेदी कराव्या लागणार आहेत.

कंपनीने भारतात निसान मैग्नाइट डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणली होती आणि तिची विक्री देखील सुरू आहे. भारतीय बाजारात या मैग्नाइटने जिवंतपणा आणला आहे, त्यासोबत निसान मैग्नाइट या कारचा वेटिंग टाईम हा भारतात 6 महिने झाला आहे.

जास्तीत जास्त लोक या कारला बुक वर्ष संपण्याच्या आधी करतील कारण नवीण वर्षात गाड्यांची किंमत वाढणार आहेत. सध्या कारची किंमत ही 4.99 ते 9.97 लाख इतकी आहे. 2020 संपे पर्यन्त या गाडीच्या भरपूर बुकिंग झालेल्या असतील.