Tata Nano Electric Spied ।। टाटा नॅनो इलेक्ट्रिक व्हर्जन टेस्टिंग ? जाणून घ्या

Tata Nano Electric Spied ।। टाटा नॅनो इलेक्ट्रिक व्हर्जन टेस्टिंग ? जाणून घ्या

टाटा नॅनो भारतीय बाजारातील एक महत्वाची गाडी होती परंतु तिचे वर्चस्व जास्त काळ टिकू शकले नाही. आत्ताच एका ठिकाणी टेस्टिंग मध्ये ई-नियो ही कार आढळली. या ई-नियो ची डिझाईन ही पूर्णपणे टाटा नॅनो च्या डिझाईनवर आधारित आहे. हे सर्व असताना देखील या कारवर कुठेच टाटाचा लोगो बघायला मिळत नाही.

टाटा नॅनो ही कार रतन टाटा यांच्या स्वप्नातील कार होती, जे स्वप्न टाटांनी साकार देखील केले. कंपनीच्या या कारच्या लाँच वेळी ग्राहकांचे प्रतिसाद हे अगदी उत्तम आले. कमी किंमत आणि छोटीशी कार यामुळे बऱ्याच ग्राहकांनी हिला पसंद केले, परंतु ही जादू जास्त काळ टिकू शकली नाही. 


आता टाटा नॅनोच्या याच मॉडेलवर एक इलेक्ट्रिक कार येऊ घातली आहे परंतु हिची निर्मिती टाटा मोटर्स करणार नाही. 2017 च्या दरम्यान टाटा मोटार आणि जेएम ऑटोमोटिव्ह यांच्या दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक करार झाला होता, त्याच्याच अनुसार आता जेयम नियो या ब्रँड नुसार ही कार बाजारात घेऊन आले आहे.

समोर आलेल्या फोटो मध्ये जी नियो दिसतीये ती नॅनोची हुबेहूब प्रतिकृती आहे. या गाडीवर नियो चे बॅच आपल्याला लावलेले दिसतात. आता ई-नियो विषयी समजून घ्यायचे झाले तर 17.7 किलोवॉट ची बॅटरी यात दिलेली आहे जी 23 एचपी पॉवर घेते आणि 23 वॉटच्या इलेक्ट्रिक मोटारला  पॉवर सप्लाय करते.


पॉवर सप्लायसाठी इलेक्ट्रा ईव्ही चा वापर केला जातो, याचाच वापर आपण इलेक्ट्रिक टियागो आणि टिगोर मध्ये बघितला आहे. या ई-नियोची मॅक्सिमम रेंज ही 203 किमी असेल तर जास्तीत जास्त स्पीड हा 85 किमी/तास असेल.  

टाटा नॅनोची विक्री एप्रिल 2019 मध्ये बंद करण्यात आली होती. परंतु या कारचे उत्पादन जून 2018 ला बंद केले गेले होते. बंद करण्याअगोदर गाडीचे एखादे दुसरे मॉडेलचे विकले जात होते. त्यासोबत नवीन सुरक्षा पद्धती याकारमध्ये नसल्याने ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


टाटा नॅनो जर आता पुन्हा लाँच करायच्या तयारीत असेल तर त्यांना नवीन सेफ्टी फीचर्स जसे एयरबॅग, सीट बेल्ट रिमायंडर, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर या गोष्टी आणाव्या लागतील. त्यासोबत आता एप्रिल 2021 नंतर आणायचं असेल तर फ्रंट एअरबॅग देखील आणाव्या लागतील. 

टाटा मोटर्स ने नॅनोला जानेवारी 2008 मध्ये ऑटो एक्स्पो मध्ये आणले होते. त्यावेळी या गाडीला रतन टाटा यांनी लोगों की कार असे संबोधले होते. खरंतर त्याप्रमाणे ही कार त्या लेव्हलला पोहोचली नाही व स्वप्नांवर पाणी फेरले गेले असेच म्हणावे लागेल.

Image Credits- SmileyTamilanTech