Md. Azharuddin Car Overturned ।। माजी भारतीय क्रिकेट कप्तान मो. अझरुद्दीन कार अपघातातून वाचले

Md. Azharuddin Car Overturned ।। माजी भारतीय क्रिकेट कप्तान मो. अझरुद्दीन कार अपघातातून वाचलेटीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि माजी लोकप्रतिनिधी मोहम्मद अझरुद्दीन यांची कार राजस्थानमध्ये पलटली. या कार अपघातात मोहम्मद अझरुद्दीन व त्यांचा पूर्ण परिवार सुरक्षित आहे. माजी भारतीय कप्तान मोहम्मद अझरुद्दीन यांची कार राजस्थान मधील सुरवाल मधून जात होती, अचानक गाडीचे एक चाक निघाले व त्यामुळे ड्रायव्हरचे कार वरील नियंत्रण सुटून कार एका ढाब्यावर जाऊन आदळली. 

सूत्रांच्या अनुसार ही कार राजस्थानमधील सुरवाल मधील लालसोट-कोटा मेगा हायवेवर जात होती. त्याचवेळी हा अपघात घडला. चांगली गोष्ट म्हणजे अझरुद्दीन व त्यांचा परिवार या घटनेत सुरक्षित आहेत परंतु त्या छोट्याश्या ढाब्यावर काम करणाऱ्या एका चाळीस वर्षाच्या व्यक्तीला मार लागला आहे. 


माजी भारतीय कप्तान आपल्या फॅमिली सोबत राजस्थानमधील रनथंबोर नॅशनल पार्कला भेट द्यायला आले होते, तेव्हाच रस्त्यात हा अपघात झाला. त्यांना अपघातानंतर दुसऱ्या कार ने त्यांच्या हॉटेलला न्हेण्यात आले.

कार चालवत असताना कारचे चाक निघाल्यानंतर कार मधील इतर व्यक्तींचे आयुष्यही धोक्यात येते. या घटनेवरून लक्षात येते की गाडीचे चाक हे योग्य रित्या बसवले गेले नसेल किंवा प्रवासात त्यात काही बिघाड झालेला असेल.

बऱ्याच वेळा कारची सर्व्हिसिंग करताना सर्व्हिस करणारा व्यक्ती नट आवळणे विसरून जातो. ज्यामुळे कारची चाके तिरकी होतात आणि मग निघून जातात. अझरुद्दीन यांच्या कार सोबत असेच काही झालेले असेल.

कारची सर्व्हिसिंग करताना जो व्यक्ती सर्व्हिसिंग करत असेल त्याच्याकडून नट योग्य पणे आवळून घ्या. कार आपल्या हातात आल्यानंतर तिच्यात काही कमतरता आहे का याची खात्री करून घ्या. 

खरतर अशा घटना सेकंड हँड गाड्यांमध्ये जास्त होतात. त्यामुळे कार जुनी झाली की तिच्यातून काही नट सैल होतात व गाडीतून आवाज यायला लागतो. जर तुम्ही गाडी घेताना निरखून घेतली तर ही समस्या तुमच्या लगेच लक्षात येईल.