How to Push Start a Car ।। असा धक्का लावाल तर गाडी लवकर सुरू होईल

How to Push Start a Car ।। असा धक्का लावाल तर गाडी लवकर सुरू होईल


कार असणाऱ्या लोकांना जीवनात कधीना कधी धक्का मारून गाडी सुरू करण्याची वेळ ही येतेच. जेव्हा तुमची कार ही जुनी असेल तेव्हा बऱ्याचदा रस्त्याच्या मधोमध कार बंद पडणे आणि स्टार्ट व्हायला त्रास देने अशा समस्या उद्भवतात. खरतर जुन्या गाड्यांचे इंजिन हे घर्षणाने कामावर आलेले असतात ज्यामुळे वापरकर्त्याला त्यांना सुरू करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. कधी कधी तर कार ला धक्का दिल्याशिवाय ती सुरूच होत नाही.

कार मध्ये प्रॉब्लेम अशा वेळी येतात जेव्हा आपली कार जास्त जुनी असेल किंवा आपल्या कारची रिपेरिंग आणि सर्व्हिसिंग ही वेळेवर केलेली नसते. जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला निघाला असाल आणि रस्त्यात कार बंद झाली तर तुम्हाला मॅकेनिक बोलवावा लागतो. जर मॅकेनिक मिळत नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहोत जेणेकरून सहजगत्या तुम्ही तुमची कार धक्का मारून सुरू करू शकता.

धक्का लावताना 2 ते 3 लोकांची गरज भासते. धक्का लावताना एक बरोबर गती मिळाली तरच कार सुरू होऊ शकते.

सर्वात पाहिले तुम्हाला तुमची गाडी ही स्टार्ट मोड मध्ये ठेवावी लागेल. त्याअगोदर कारच्या बॅटरीच्या वायर या योग्य आहेत का हे बघून घ्या. कधी कधी या वायरवर कार्बनचे संचयन झाल्याने कार सुरू होत नाही त्यामुळे ते तपासून बघा.

जर तारा योग्य आहेत आणि बॅटरी देखील पूर्णपणे चार्ज आहे तर ड्रायव्हर सीट वर बसून कारचा हॅन्डब्रेक काढा जेणेकरून कार आता ब्रेक फ्री असेल.

त्यानंतर कारला धक्का मारण्यासाठी 2 ते 3 लोक शोधा. धक्का मारत असताना कार ही पूर्णपणे क्लच दाबून दुसऱ्या गियरवर ठेवा. पहिल्या गियरवर कार असेल तर क्लचवर दबाव येतो व हवा तो वेग मिळत नाही.

कारने स्पीड पकडल्यावर पटकन गियर सोडून द्या, ही क्रिया झटक्यात झाल्याने कदाचित तुम्हाला झटका लागेलं पण तुमची कार सुरू झालेली असेल.

हे देखील लक्षात ठेवा की जोपर्यंत कार योग्य स्पीड घेत नाही तोपर्यंत क्लच सोडू नका अन्यथा तुमची मेहनत वाया जाईल.