Normal vs Premium Fuel ।। नॉर्मल किंवा प्रीमियम पेट्रोल, कोणते आहे तुमच्या गाडीसाठी योग्य?

Normal vs Premium Fuel ।। नॉर्मल किंवा प्रीमियम पेट्रोल, कोणते आहे तुमच्या गाडीसाठी योग्य?


प्रत्येकवेळी आपण पेट्रोल पंप वर गेल्यावर आपल्याला नॉर्मल आणि प्रीमियम किंवा पावर असे दोन पेट्रोलचे प्रकार बघायला मिळतात. आजही कित्येक गाडी वापरणाऱ्यामध्ये संभ्रम आहे की कोणते पेट्रोल त्यांच्यासाठी योग्य आहे? बऱ्याच वेळा पेट्रोल पंप वर उभा असणारा कर्मचारी आपल्याला त्या प्रीमियम किंवा पावर पेट्रोल चे फायदे समजून सांगतो तेव्हा आपण ते भरून घेतो परंतु कधी आपण विचार केला आहे का हे प्रीमियम किंवा पावर पेट्रोल ज्याचे तुम्ही थोडे जास्त पैसे देताय ते आपल्या गाडीसाठी योग्य आहे का?

आत्ताच इंडियन ऑइल कंपनी ने हाय ऑकटाईन प्रीमियम पेट्रोल लाँच केलय ज्याची किंमत आपल्या नॉर्मल पेट्रोल पेक्षा जवळपास 15 रुपयांनी जास्त आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत तूमच्या गाडीसाठी किंवा कारसाठी आणि त्यांच्या इंजिन साठी जास्त मायलेज देणारे पेट्रोल कोणते असेल व नॉर्मल आणि प्रीमियम पेट्रोल मध्ये फरक काय आहेत.

प्रीमियम पेट्रोल vs नॉर्मल पेट्रोल

पेट्रोलची ग्रेड ही त्याच्या ऑकटेन व्हॅल्यू वर आधारित असते. भारतात नॉर्मल पेट्रोलची ऑकटेन व्हॅल्यू ही 87 तर प्रीमियम पेट्रोलची 91 इतकी रेटिंग असते. हाई ऑकटेन फ्युअल चा कम्प्रेशन रेशो हा जास्त असतो म्हणजेच हे इंजिन स्टार्ट होण्याअगोदर पेटत नाही त्यामुळे कार्बन चे संचयन होत नाही. 

तर साधारन नॉर्मल पेट्रोल मध्ये ऑकटेन व्हॅल्यू कमी असल्याने इंजिन सुरू होण्याआधी काही सेकंद हे जळते, ज्यामुळे इंजिन मध्ये कार्बनचे संचयन व्हायला सुरुवात होते व हळूहळू गाडीचे मायलेज आणि परफॉर्मन्स कमी व्हायला लागते.

हाई ऑकटेन पेट्रोलच्या वापराणे इंजिनमध्ये स्टार्ट होण्याच्या वेळी खटखट असा आवाज येत नाही, म्हणजेच इंजिन सुरू होण्यासाठी हे फ्युअल आरामदायक असते. तर नॉर्मल पेट्रोलच्या वापराने काही काळाने इंजिनमधून सुरू होताना खटखटन्याचा आवाज येतो.

कोणत्या इंजिनसाठी कोणते फ्युअल योग्य?

प्रीमियम म्हणजेच हाई ऑकटेन पेट्रोल जास्त कम्प्रेशन असलेल्या इंजिनसाठी उपयुक्त असते. स्पोर्ट्स कार किंवा स्पोर्ट्स बाईक ज्यांच्यामध्ये पॉवरफुल इंजिन लावलेले असते त्यांचा परफॉर्मन्स कायम ठेवण्यासाठी प्रीमियम फ्युअल टाकनेच योग्य ठरते.

आपल्या दैनंदिन जीवनातील गाड्यांना म्हणजेच कमी पॉवर चे इंजिन असणाऱ्या गाड्यांना हे प्रीमियम फ्युअल जास्त लाभदायक नसते. कमी पॉवर इंजिन मध्ये कमी कम्प्रेशन असल्याने हे प्रीमियम फ्युअल इथे जास्त कमाल दाखवू शकत नाही. त्यामुळे परफॉर्मन्स आणि मायलेजमध्ये जास्त काही आपल्याला सुधारणा दिसत नाही. त्यामुळे आपल्या नॉर्मल गाड्यांना नॉर्मल फ्युअल अगदी योग्य असेल.

प्रीमियम फ्युअलचे फायदे

पेट्रोल कंपनीच्या म्हणण्यानुसार प्रीमियम फ्युअल ने गाडीच्या मायलेज मध्ये सुधारणा होते व इंजिन देखील ओव्हरलोड होत नाही. हाई ऑकटेन पेट्रोल नॉर्मल पेट्रोल पेक्षा कमी प्रमाणात उत्सर्जन करते. प्रीमियम पेट्रोलमध्ये असे काही बाह्य पदार्थ टाकले जातात ज्यामुळे बाईकच्या इंजिनमध्ये कार्बन कमी साठते आणि जर साठलेले असेल तर ते बाहेर टाकते.

आपल्यासाठी कोणतं योग्य असेल?

गाडी घेताना तुम्हाला एक मॅन्युअल दिलेले असेल ज्यामध्ये गाडीविषयी माहिती तर असतेच पण त्यात गाडीला साजेसे आणि लागू होणारे फ्युअल देखील दिलेले असते. जर तुमची कार किंवा बाईक 5 ते 10 वर्ष जुनी असेल तर तिला नॉर्मल फ्युअल टाकनेच योग्य असेल. जर तुमची कार किंवा बाईक जास्त पावरफुल असेल तर त्यासाठी पावर किंवा प्रीमियम पेट्रोलच योग्य असेल.