Renault Kiger Spied Testing ।। रेनॉल्ट काईगर दिसली टेस्टिंग करताना, बघा कन्सेप्ट मॉडेल पेक्षा काय आहे वेगळं

Renault Kiger Spied Testing ।। रेनॉल्ट काईगर दिसली टेस्टिंग करताना, बघा कन्सेप्ट मॉडेल पेक्षा काय आहे वेगळं


रेनॉल्ट काईगर ही रेनॉल्ट कंपनीची पुढील वर्षी येणारी गाडी असणार आहे. 2021 च्या सुरुवातीच्या तिमाही मध्ये ही गाडी लाँच केली जाईल. लॉकडाऊन संपल्यानंतर गाडीची लगेच टेस्टिंग सुरू केली आहे. आता पुन्हा एकदा ही कार रस्त्यावर टेस्टिंग करताना दिसली आहे. रेनॉल्ट काईगर आपल्या कन्सेप्ट मॉडेल पेक्षा अनेक वेगळ्या फीचर्स सोबत लाँच होऊ शकते कारण ती आता सणरुफ डिझाईन सोबत बघितली गेली आहे.


रेनॉल्ट काईगर कंपनीसाठी एक महत्वाचे मॉडेल असणार आहे. अंदाज लावले जाताय की कंपनीचे नवे प्रतिस्पर्धी निसान मैग्नाइट पेक्षा जास्त फीचर्स या गाडीत दिले जातील.सांगू इच्छितो की या दोन्ही कंपनीचे हे मॉडेल्स एकाच सीएमएफ-ए प्लॅटफॉर्मवर बनवलेले आहेत. 


काही वेळा पूर्वीच रेनॉल्ट काईगरच्या कन्सेप्ट कारची डिझाईन समोर आली होती. त्यानंतर आता गाडीची टेस्टिंगदेखील सुरू झालेली आहे. कंपनी या काईगर ला देशातील सर्वात स्पर्धेचे सेगमेंट म्हणजे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मध्ये उतरवले जात आहे. मागील वर्षी या सेगमेंट मध्ये अनेक नवीन गाड्या आल्यात व पुढील 2021 मध्ये ही भरपूर येणार आहेत.


आता रेनॉल्ट काईगरचे तीन मॉडेल बघितले गेले आहेत. यातील एक मॉडेल हे सनरुफ असलेले आहे तर बाकीचे 2 हे सनरुफ नसलेले आहेत. याच्या शिवाय अलॉय व्हील किंवा इतर कोणत्याही विभागात बदल नव्हते. काईगरच्या प्रतिस्पर्धी मैग्नाइट मध्ये सनरुफचे फिचर उपलब्ध नाहीये.

रेनॉल्ट काईगर मध्ये एलईडी डीआरएल सोबत स्प्लिट एलईडी हेडलॅम्प, नवीन फ्रंट ग्रील, बंपर वर ट्राय एलईडी प्रोजेक्टर व बोनेट लाईन वर एलईडी स्ट्रीप, ड्युल टोन अलॉय व्हील दिलेले आहेत. साईडला रुंद व्हील आर्चेस आणि पाठीमागे मोठे रियर बंपर, C आकाराची टेल लॅम्प, सेंट्रल ड्युअल एग्जोस्ट सिस्टम दिले आहेत.


इंटिरियर विषयी माहिती समोर आलेली नाहीये, परंतु नवीन डॅशबोर्ड, नवीन स्टीरिंग व्हील, आडवे एसी व्हेंट सोबत अन्य नवीन फीचर्स मिळतील. इंजिन विषयी सांगायचे झाले तर कंपनी बोलते की याला नवीन 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सोबत आणले जाईल. हे इंजिन 97 बीएचपी ची पॉवर आणि 160 न्यूटन मीटर टॉर्क देते.

यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि सिव्हीटी असे ऑपशन मिळतील. कंपनीने काईगरला 210 मिमी ग्राऊंडक्लियरन्स देण्यासाठी 19 इंचाचे अलॉय व्हील वापरले आहेत. काईगरचचे कन्सेप्ट मॉडेलचे स्पोर्टी दिसत होते, त्यामुळे प्रोडक्शन मॉडेल कसे असेल हे बघण्यासारखी गोष्ट असेल.

रेनॉल्ट काईगर भारतीय बाजारात मारुती सुझुकी, विटारा ब्रेझा, हुंडाई वेन्यू, किया सोनेट, टाटा नेक्सोन , फोर्ड इकोस्पोर्ट आणि होंडा डब्ल्यूआर-व्ही या गाड्यांना टक्कर देणारी आहे. या सेगमेंट मध्ये सर्वात स्वस्त मॉडेल आलेले आहेत त्यामुळे आता कंपनी आपल्या काईगरची कशा प्रकारे मार्केटिंग करते ही बघण्यासारखी गोष्ट असेल.

फोटो क्रेडिट: RushLane