Sonalika first field ready electric Tractor ।। सोनालिकाने लाँच केलाय भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
Sonalika first field ready electric Tractor ।। सोनालिकाने लाँच केलाय भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
ट्रॅक्टर निर्माता कंपनि सोनालिका ने भारतातील पहिला फिल्ड रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सोनालिका टायगर इलेक्ट्रिक लाँच केला आहे. कंपनीने हा ट्रॅक्टर मात्र 5.99 लाख या एक्स शोरूम किंमतीत लाँच केला आहे. संपूर्ण भारत भरातील शोरूम मध्ये ट्रॅक्टरची बुकिंग देखील सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रॅक्टर युरोप मध्ये डिझाइन केलेला आहे व इन हाऊस याला विकसित केलेलं आहे. टाईगर इलेक्ट्रिक मध्ये नवीन तंत्रज्ञान असलेली आयपी 67 कंपलेंट 25.5 किलोवॉट ची नॅचरल कुलिंग कॉम्पॅक्ट बॅटरी लावलेली आहे.
या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला चार्ज करायला फक्त 10 तास लागतात, 10 तासात हा संपूर्ण चार्ज होतो. या ट्रॅक्टर मध्ये जर्मनी मध्ये बनवलेली नवीन इलेक्ट्रिक मोटार बसवण्यात आलेली आहे जी 100 टक्के टॉर्क प्रदान करू शकते.
सोनालिका ग्रुपच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी, म्हणजे रमण मित्तल यांनी ट्रॅक्टर विषयी सांगितले की, हरित क्रांतीने समृद्ध भारताला आणखी समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी आम्ही एक पाऊल टाकले याचा आम्हाला अभिमान आहे. पुढे त्यांनी सांगितले की सण 2023 पर्यंत ईव्ही च्या दिशेने भारत जी वाटचाल करत आहे त्याच्या अनुसार आम्ही काम करत आहोत. कंपनीच्या मते टाईगर इलेक्ट्रिक शेतकऱ्यांना खूप जास्त आराम देऊ शकेल.
या ट्रॅक्टरमध्ये इंजिन गरम होण्याची चिंता नाहीये. डिझेल नसल्यामुळे व्हायब्रेशन देखील कमी होतात. यामुळे डाउनटाईम कमी होतो व मेंटेनन्स देखील झीरो होतो.
कंपनीने दावा केला आहे की हा ट्रॅक्टर 2 टन वजनाची ट्रॉली सहज खेचू शकतो. याशिवाय या ट्रॅक्टरची जास्तीत जास्त स्पीड ही 24.93 किमी प्रति तास इतकी आहे. ट्रॅक्टरची बॅटरी ही 8 तासांचा बॅकअप देऊ शकते.
सोनालिका ट्रॅक्टरने दिलेल्या माहितीनुसार सोनालिका टाईगर इलेक्ट्रिक मध्ये आपल्याला फास्ट चार्जिंग ही सुविधा देखील दिलेली आहे. माहिती नुसार हा ट्रॅक्टर फक्त 4 तासात फास्ट चार्जिंगवर फुल चार्ज होऊ शकतो.
टिप्पणी पोस्ट करा