1 लिटर पेट्रोलमध्ये 99 किमी धावणाऱ्या बजेट बाईक्स ।। Top 8 Bikes with best Mileage in India

1 लिटर पेट्रोलमध्ये 99 किमी धावणाऱ्या बजेट बाईक्स ।। Top 8 Bikes with best Mileage in India 


आम्ही आज तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून  8 मुख्य अशा बाईक्स विषयी सांगणार आहोत ज्या बजेट मध्ये देखील आहेत आणि त्यांचे एव्हरेज देखील खूप चांगले आहे. Top Bikes in India with 99KMPL Mileage

1 लिटर पेट्रोलमध्ये 99 किमी धावणाऱ्या बजेट बाईक्स ।। Top 8 Bikes with best Mileage in India


कुठलीही गाडी आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा आपल्या मनात विचार असतो की ही गाडी मायलेज किती देत असेल? आता सध्या पेट्रोलच्या किंमती ज्या प्रमाणे वाढल्या आहेत त्या दृष्टीने विचार केला असता मायलेज विषयी विचार करणे देखील खूप जास्त गरजेचे बनलेले आहे. त्यामुळे आता गाड्या शोधण्यासाठी आणखी सोप्पे व्हावे म्हणून तुमच्या सर्व आवडत्या ब्रँडच्या टॉप गाड्या आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


TVS Sport


ही बाईक TVS या विश्वसनीय कंपनी कडून आहे. या बाईक मध्ये तुम्हाला 109.7 सीसी चे सिंगल सिलेंडर असलेले एयर कुल्ड फ्युअल इंजेक्ट इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 8.29 PS इतकी पॉवर आणि 8.7Nm टॉर्क तुम्हाला प्रदान करण्याची क्षमता ठेवते. 4-स्पीड गियर बॉक्स सोबत हे इंजिन सज्ज आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 95 किलोमीटर धावू शकते. या बाईकची एक्स शोरूम किंमत ही 54,850 इतकी असून ती तुम्हाला सरासरी 60,000 किंमतीमध्ये मिळून जाईल.


Bajaj CT100

बजाज कडून खूप कमी किंमतीत येणारी ही बाईक 99.27 सीसी च्या फोर स्ट्रोक इंजिन सोबत मिळते. हे इंजिन सिंगल  सिलेंडर आहे. हे इंजिन 7500 RPM वर तुम्हाला 5.81kW इतकी मॅक्सिमम पॉवर आणि 5500 RPM वर 8.34Nm हा जास्तीत जास्त टॉर्क देते. 

या इंजिन मध्ये देखील तुम्हाल 4 स्पीड गियर बॉक्स मिळेल. ही बाईक तुम्हाला 1 लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 99 किलोमीटर मायलेज देऊ शकते. या बाईकची एक्स शोरूम किंमत ही 47,654 रुपये इतकी असून 50 हजाराच्या आसपास ती तुम्हाला मिळून जाईल.


Bajaj कडक CT100

बजाज कंपनी कडून CT100 हीच गाडी 100 सीसी सोबत नवीन तीन रंगांमधून बाजारात आणलेली आहे. ब्ल्यू एबोनी ब्लॅक, येल्लो मॅट ऑलिव्ह ग्रीन, रेड ग्लॉस फ्लेम रेड हे नवीन आकर्षक तीन रंग आहेत. या गाडीची किंमत ही सरासरी एक्स शोरूम 46,432 रुपये आहे. या गाडीत तुम्हाला दमदार असलेले DTSi इंजिन दिलेले आहे. यात नवीन फीचर्स मध्ये फ्रंट सस्पेंशन बेलोज, रबर टॅंक पॅड आणि फ्युअल मीटर देखील दिलेले आहे. या गाडीत 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिन आपल्याला दिलेले आहे. हे इंजिन 7500 rpm वर 7.9बीएचपी आणि 5500 rpm वर 8.34 Nm हा जास्तीत जास्त टॉर्क आपल्याला देते. या बाईकमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियर बॉक्स सोबत 90 किलोमीटर एव्हरेज देण्याची क्षमता आहे. या बाईकचा हायलाईट म्हणजे पुढील सस्पेंशन हे हायड्रोलिक टेलिस्कोपिक असून स्प्रिंग इन स्प्रिंग प्रकारचे 100mm व्हील ट्रॅव्हल रियर सस्पेंशन दिलेले आहे.


Honda Livo

होंडा कडून देखील आपल्याकडे एक गाडी आली आहे. होंडाच्या लिव्हो या बाईक मध्ये तुम्हाला 109.51 सीसी चे एयर कुल्ड इंजिन मिळते. हे इंजिन BS-VI आहे. या बाईकमध्ये देखील तुम्हाला 4 स्पीड गियर बॉक्स दिलेला आहे. ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 74 किलोमीटर धावू शकते. Honda Livo या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 70,059 रुपये इतकी आहे.


Hero Splendor iSmart 110

होंडाचे नाव यादीत आलेले आहे तर हिरो का मागे असेल? हिरोच्या स्प्लेनडर आय स्मार्ट 110 या बाईक मध्ये तुम्हाल BS-VI इंजिन मिळते. 1 लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 75 किलोमीटर प्रतिलीटर इतके एव्हरेज देऊ शकते. या बाईकची एक्स शोरूम किंमत ही 67,100 रुपये इतकी आहे.


Hero Splendor Plus

जुनी स्प्लेनडर तुम्हाला माहीत असेलच तिचेच काही बदल करून कंपनीने ही बाईक नवीन स्टाईल मध्ये सादर केली आहे. या बाईक मध्ये तुम्हाला 100 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आपल्याला मिळते आहे.  हे इंजिन BS6 आहे. हे इंजिन 8000 rpm वर 7.91 BHP पॉवर देऊ शकते आणि 6000 rpm वर 8.05Nm इतका टॉर्क देते. या इंजिन सॊबत तुम्हाला 4 स्पीड गियरबॉक्स देण्यात आलेला आहे. 

ही बाईक 1 लिटर पेट्रोल मध्ये 87 किलोमीटर प्रवास करू शकते. या बाईकची महाराष्ट्रातील एक्स शोरूम किंमत ही 59,750 रुपये इतकी आहे.


Bajaj Platina

बजाज कंपनीची काही काळापूर्वी सर्वात जास्त चाललेली बाईक म्हणजे बजाज प्लॅटिना! या बाईक मध्ये कंपनीने काही बदल करून नवीन व्हर्जन लाँच केले आहे. या बाईकमध्ये 102 सीसी चे BS6 कंपाईल्ड इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 8 बीएचपी पॉवर  आणि 8Nm इतका जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करू शकते. 

ही बाईक देखील 4 स्पीड गियर आहे आणि 1 लिटर पेट्रोल मध्ये ही बाईक 96.9 म्हणजेच 97 किलोमीटर जाऊ शकते. या बाईकची एक्स शोरूम किंमत ही 51,667 रुपये इतकी आहे.


Bajaj Platina 100ES

या बाईकची किंमत 64,301 रुपये आहे. बाईकमध्ये 102cc इंजिन आहे. कंपनीने दावा केला आहे की ही बाईक 97 किमीचे मायलेज देते. डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेकच्या वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये ही बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 110cc H-GEAR मॉडेलसहदेखील उपलब्ध आहे.